Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर येथील वीर या ठिकाणी भीक मागणारा अनोळखी व्यक्ती अंदाजे 65 वर्ष अकस्मात मयत सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्री क्षेत्र वीर देवस्थान येथील वीर तालुका पुरंदर या ठिकाणी 28 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारामध्ये गावातील सेवानिवृत्त पोलीस पाटील लालोबा रभाजी सोनवणे यांनी फोन करून कळवले असता, की गावातील एसटी स्टँड मधील भिक मागणारा व्यक्ती हा एसटी स्टँड मध्ये मरण पावलेला आहे, तो आपल्या देवस्थान या ठिकाणी भिक मागून आपली उपजीविका भागवत होता, त्यासंदर्भात पोलीस पाटील यांनी सासवड पोलीस स्टेशनची व परिंचे पोलीस स्टेशनची संपर्क केला असता अनोळखी अकस्मात मयत वय अंदाजे 65 वर्ष यांचे देवस्थानच्या ॲम्बुलन्समध्ये ग्रामीण रुग्णालयातून या सासवड ठिकाणी घेऊन आलो असता, डॉक्टरांनी त्याला तपासले असता, त्या ठिकाणी तो अकस्मात मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे. त्या संदर्भातील समक्ष माहिती सासवड पोलीस स्टेशन येथे हजर राहून, पोलीस पाटील वीरचे यांनी लालोबा रभाजी सोनवणे यांनी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनची संपर्क साधून त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. जर या संदर्भातील या व्यक्तीची ओळख पटल्यास त्या ठिकाणी सासवड पोलीस स्टेशनची संपर्क साधावा, असे परिंचे बीटचे पोलीस संदिप पवार यांनी ही माहिती दिली आहे.

Post a Comment

0 Comments