Hot Posts

6/recent/ticker-posts

सासवड येथे मातीवरील महाराष्ट्र केसरी कुस्त्याच्या आखाड्याचे पूजन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: 13 मार्च रोजी सासवड (ता. पुरंदर) येथील भोंगळे पेट्रोल पंपा समोर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धा 13 मार्च रोजी सुरू होत आहेत. या निमित्ताने नारायणपूर येथील दत्त मंदिराचे मुख्य व्यवस्थापक भरतनाना क्षिरसागर जेजुरी देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व कलशपूजन करून, कुस्ती आखाड्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य भारतीय शैली ( लाल माती) कुस्ती संघाचे राज्याचे सचिव मोहन खोपडे, पंच रवी बोत्रे, भरत नाना क्षिरसागर, सासवड नगरीचे उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, जेजुरी देवस्थानचे विश्वस्त विश्वास पानसे, पंडित मोडक, सागर मोडक, पै. महेश गायकवाड, पै. किरण शेंडे, पै. सुशांत खवले, पै. वैभव कोडलकर, पै. महादेव कचरे, आदित्य जगताप, रघुनाथ जगताप, संतोष बोरकर माजी सरपंच नारायणपूर आदी उपस्थित होते. 12 मार्च रोजी वजन गट तयार करणे. त्यानंतर 13 मार्च दोन आखाड्यावर कुस्त्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक पैलवान प्रकाश बापू जगताप प्रतिष्ठान करणार आहे.फोटो : सासवड ( ता. पुरंदर ) येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती आखाड्याचे भूमिपूजन करीत असताना भरत क्षीरसागर शेजारी मंगेश घोणे, पै. प्रकाश जगताप व इतर.

Post a Comment

0 Comments