Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराजस्व अभियानाद्वारे दाखल्यांचा मिळणार लाभ; तर पुरंदर तालुक्यात ७ मार्चपासून आयोजन महसूल विभागाकडून लाभ घेण्याचे आवाहन ञ सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज व महारजसव समाधान शिबिर अभियानाची मार्च ते मे महिन्यापर्यंत आयोजन केले जाणार आहे, नागरिकांना सुलभ रीत्या विविध दाखलेे मिळणार आहेत ,अभिलेख दुरुस्ती व फेरफार तशी शासकीय योजना साठी अर्ज देखील करता येणार आहेत, यासाठी तालुक्यांमध्ये महसूल विभागामार्फत मंडल निहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, त्यासाठी सर्वसाधारण नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी आवाहन पुरंदरच्या उपविभागी य अधिकारी तथा प्रांत वर्षा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराच्या पूर्व तयारीसाठी सोमवारी दिनांक 2 मार्च रोजी बैठकीचे आयोजन प्रशासकीय इमारत सासवड येथे केले होते, अशी माहिती तहसीलदार विक्रम राजपूत यांनी दिली. या बैठकीस निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील, जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ लोले, अजय इंगळे ,डॉक्टर प्राजक्ता दुर्गाडे, पंचायत समिती सदस्य अमित झेंडे, माऊली यादव, माणिक निंबाळकर ,मोनिका कांबळे, सायली शिंदे, स्मिता निगडे, अर्चना कटके, मंडल अधिकारी, तलाठी, माजी सरपंच, उपसरपंच, संबंधित विभागाचे अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तशी संबंधित कर्मचारी उपस्थित राहणार आहेत, प्रलंबित असणाऱ्या कामांचा निफ्टारा करण्यावर भर देण्यात येणार आहे, नागरिकांनी आपल्या तक्रारी अर्ज व आवश्यक कागदपत्रासहसंबंधित दिवशी शिबिरास उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा अशी आवाहन तहसीलदार राजपूत यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे ,शिबिराचे वेळापत्रक वाघापूर 7 मार्च ,शिवरी 14 मार्च, नारायणपूर 10 एप्रिल, परिचे 17 एप्रिल, सासवड 8 मे ,तर जेजुरी 15 मे रोजी होणार आहेत, तर अर्ज स्वीकारून कार्यवाहीचा शिबिरामध्ये सातबारा उताऱ्यावरील त्रुटी, दुरुस्ती, फेरफार नोंदी, वारस नोंद, जमिनीचे व्यवहार व हस्तांतरण यांची तपासणी तसेच प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यात येणार आहे, प्रधानमंत्री.किसान सन्मान योजना आदी योजना बाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.' लोकसेवा हक्क कायदा' अंतर्गत विविध प्रमाणपत्रे व दाखल्याचे अर्ज स्वीकारून त्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे. त्रुटी असलेली कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे, असे ही सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments