Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी डॉक्टर मणिभाई देसाई पतसंस्थेचे 11 व्या शाखेचे उद्घाटन; सहकार आयुक्त दिपक तावरे सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: डॉक्टर मणिभाई देसाई सहकारी पतसंस्थेची माजे संबंध हे जुने असून, त्यांचे कामकाज पारदर्शक व शिस्तबद्ध असून, व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी सतत ऑडिट'अ' वर्गात कामकाजाचा लेखाजोखा पारदर्शक पद्धतीने ठेवलेला आहे, तर सासवड या ठिकाणी अकराव्या शाखेचे उद्घाटन माझ्या हस्ते झाल्याचे, अशा शब्दांमध्ये गौरव उद्गागार सहकार आयुक्त व निबंधक दिपक तावरे यांनी संस्थेच्या कार्याचा गौरवोद्गार करताना केला. या सोहळ्याला माजी राज्यमंत्री दादा जाधवराव, माजी आमदार संजय जगताप, अशोक टेकवडे, प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे, विजय कोलते, अतिरिक्त निबंधक शैलेश कोतमिरे, उपनिबंधक मिलिंद सोबले, जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी आपले यावेळी मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी प्रास्ताविक अहवालातून वाचन करताना सांगितले की, संस्थेची सभासद संख्या 21,000 असून,631 कोटी 26 लाखाचा व्यवसाय आहे, ठेवी 355 कोटी 97 लाखाच्या आहेत, 275 कोटी 29 लाख रुपयाचे कर्ज वाटप असून, दरवर्षी सहा कोटीचा नफा, तर पंधरा टक्के लाभांश हा 32 वर्षे सतत ऑडिट 'अ' वर्ग आहे, संस्थेचे कर्ज देणे त्याचे व्याज मिळवणे, या भावनेतूनच समाजातील सर्व स्तरातील कामकाज महाराष्ट्रभर सध्या चालू आहे, यावेळी आनंदी काकी जगताप सासवड नगराध्यक्षा, हरिभाऊ लोळे जिल्हा परिषद सदस्य ,सुदाम (आप्पा) इंगळे, माणिक झेंडे, बाळासो कामठे, न्यानोबा कांचन, शामकांत भिंताडे, संचालक शरद वनारसे, जीवन शिंदे, सारिका काळभोर, प्रवीण दरेकर ,भाऊसो कांचन, खेमचंद पुरुस वाणी, धनसिंग पोदकुले, कमल कांचन, लक्ष्मण वाल्हेकर सरव्यवस्थापक, कांतीलाल चौधरी, संजय टिळेकर, अनिकेत कांचन, रोहिदास उद्रे ,संजय कांचन ,शाखा व्यवस्थापक शिवाजी नवले, शाखा सल्लागार सुजित बडधे, सागर जगताप, रामदास कामधे, सुनील लांडगे, संतोष जगदाळे, मणिभाई संस्थेतील सर्व शाखा व्यवस्थापक, कॅशियर, क्लार्क ,कर्मचारी, पिग्मी एजंट ,सभासद आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रवी पवार यांनी केले, तर डॉक्टर मणिभाई पतसंस्थेचे उपाध्यक्ष रामदास चौधरी यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments