Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील विमानतळ प्रकल्प बाधीतांची शरद पवार यांच्याकडे धाव; खानवडी येथे फुले स्मारकात उद्या बैठक सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर विमानतळ प्रकल्प बाधित गावातील शेतकरी जेष्ठ नेते शरद पवार यांच्याशी संवाद साधून, आपली कैफियत मांडणार आहेत. बुधवारी दि. 15 दुपारी 3वा खानवडी येथील महात्मा फुले स्मारकात ही बैठक होणार आहे. पुरंदर विमानतळाबाबत 90% पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या संमती असल्याचा दावा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केला जात आहे, मात्र शासन पेपर बाजी करत असून, स्थानिक शेतकऱ्यांनी संमती दिली नाही, केवळ खाजगी गुंतवणूकदार व व्यापाऱ्यांनी संमती दिली असा दावा प्रकल्प बाधित गावातील शेतकरी करत आहेत, त्यामुळे पुरंदर विमानतळाबाबत उलट-सुलट चर्चा होत आहेत, कुंभारवळण, एखतपुर, मुंजवडी, वनपुरी, उदाचीवाडी खानवडी येथील नियोजित 3,000 एकर क्षेत्रातील शेतकरी राजी झाले असून, पारगाव येथील शेतकरीही तयार आहेत असे सांगितले जाते, मात्र संवादासाठी शेतकऱ्याकडे आलेल्या शासकीय अधिकारी रात्री दहा वाजता नंतर जात आहेत तर विमानतळ संदर्भात रेटची माहिती सुद्धा तोंडी देत आहेत अधिकारी व एजंट शेतकरी यानी तोंडी आश्वासन देत आहेत लेखी आश्वासन अधिकारी याकडे काहीच नाही अशा तक्रारी आता पुढे या अधिकारी समोर विश प्राशन सुध्दा करण्यात येणार आहे मग अधिकारी वगॅ व एजंट याना समजेल पुढे केले की काय होते, भूसंपादन अधिकाऱ्यांच्या समोरच शेतकऱ्यांनी तोंड झोडून घेतले, आमचा विरोध आहे, जबरदस्ती केल्यास फाशी घेऊ, असेही सांगत खिशातील दोरी प्रसारमाध्यमासमोर दाखवली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार व शेतकरी यांच्यातील बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून, यात काय चर्चा होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे गुंतागुंतीच्या प्रश्नावर योग्य पर्याय काढण्याबाबत, शरद पवार यांची लौकिक असून, विमानतळाच्या प्रश्नावरही तेच अधिकार वाणीने बोलू शकतात, सात गावातील शेतकऱ्यांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रेय झुरंगे यांनी केले आहे अशी माहिती प्रतिनिधीला दिली आहे.

Post a Comment

0 Comments