पुरंदर तालुक्यातील वीर येथे महिलेचा विनयभंग सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वीर ता. पुरंदर येथे महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सासवड पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, ही घटना गुरुवारी दि. 9 रोजी दुपारी अडीच वाजता ब्राह्मण वाडा ते धसाडेआळी कॉर्नर या दरम्यान घडली. अमोल बाळासो धुमाळ असे गुन्हा दाखल झालेल्या चे नाव आहे, या प्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दाखल केली आहे, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तिच्या मुलाला अंगणवाडीतून पायी घरी घेऊन जात होती, ब्राह्मणवाडा ते धसाडे आळी कॉर्नरच्या मेडिकल पर्यंत धुमाळणे पीडित महिलेची दुचाकी वरून पाठलाग केला, तसेच तिला दुचाकी वर बसण्यासाठी आग्रह करत होता, तिला लज्जास्पद असे कृत्य व वर्तन केल्याने पिढीता घाबरून जवळच्या मेडिकलमध्ये आसरा यासाठी गेली आणि तिने त्या ठिकाणी सर्व प्रकार तेथील नागरिकांना सांगितला. तोपर्यंत धुमाळ तेथे ही आला त्यांनी त्यानंतर घरात घुसून देखील विनयभंग केल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. वरिष्ठ पोलीस सासवडचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन पवार हे पुढील तपास करत आहेत.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments