Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील पुरंदर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने सदस्य आरक्षण सोडत जाहीर सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 आरक्षण सोडत आदेश प्रारित केले असून, जिल्हाधिकारी पुणे आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर केला होता, त्या अनुषंगाने वर्षा लांडगे उपविभागीय अधिकारी पुरंदर यांनी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात त्यांची आली होती. यावेळी विक्रम राजपूत तहसिलदार पुरंदर, प्रणोती श्रीश्रीमाळ गट विकास अधिकारी पुरंदर, तहसीलदार ऑफिस मधील धानेपकर प्रकाश, तर पुरंदर पंचायत समिती मधील अधिकारी व कर्मचारी व पुरंदर ग्रामीण भागातील नागरिक, पत्रकार व विविध पक्षांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते .पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 आरक्षण सोडतेचा कार्यक्रम पंचायत समिती मधील मीटिंग हॉलमध्ये कार्यक्रम सुरू करण्यात आला. सर्वप्रथम वर्षा लांडगे उपविभागीय अधिकारी पुरंदर यांनी हॉलमधील उपस्थित असलेले सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, व प्रतिनिधी व पत्रकार यांचे स्वागत केले. आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. आरक्षण सोडतीचा कार्यक्रम हा महाराष्ट्र पंचायत समिती गणामध्ये जागांची वाटप करण्यात आली. त्या जागी चक्राणूक फिरवण्याची पद्धत, नियम 2019 तसेच राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्र यांच्याकडील आदेश नुसार पार पाडण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी पुरंदर वर्षा लांडगे यांनी उपस्थितांना सभागृहामध्ये दिली. तसेच सदर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पाडण्याकरिता विभागीय आयुक्त पुणे विभाग यांनी मंजूर दिलेली राजपत्र, यामधून लोकसंख्या व प्रवर्गाची राखीव जागांची संख्या यांना मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे, तर विचारात घेतले जाणार आहे, असे हॉलमध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांना सांगितले, व गणातील आरक्षण निश्चिती करतानाची त्या टाकून, जागांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार असल्याबाबत उपस्थित यांना माहिती दिली. सोडती कारकांची त्या कारणासाठी शाळेतील विद्यार्थी प्रकाश गतिबंग गुल व आदिराज देविदास तोटरे यांच्या मदतीने चिट्ट्या काढण्यात आल्या ,सर्व गणातील जागांचे आरक्षण सुरक्षित या रित्या, पारदर्शक व बरणीमध्ये टाकून, विहित कार्यपद्धतीने अनुसरून, उपस्थितांमध्ये मुलांच्या हातून उपस्थितीमध्ये सर्व नागरिक, प्रतिनिधी, यांच्या समक्ष चिट्ट्या काढण्यात आली. सोबतच्या तक्त्यात दर्शविलेल्या प्रमाणे जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. एक गराडे निवडणूक विभाग क्रमांक 50 तर निर्वाचक गणाच्या क्रमांक 99 सर्व साधारण महिला, दोन दिवे निवडणूक विभाग क्रमांक 50 तर निर्वाचक गणाचा क्रमांक 100 नागरिकांचा मागास प्रवर्ग ,तीन बेलसर निवडणूक विभाग क्रमांक 51 तर निर्वाचक गणाचा क्रमांक 102 सर्वसाधारण, चार माळशिरस निवडणूक विभाग क्रमांक 51 तर निर्वाचक गणाच्या क्रमांक 101 सर्वसाधारण. पाच वीर निवडणूक विभाग क्रमांक 52 तर निर्वाचक गणाचा क्रमांक 104 सर्वसाधारण, सहा भिवडी निवडणुक विभाग क्रमांक 52 तर निर्वाचक गणाचा क्रमांक 103 नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री. सात निरा शिवतक्रार निवडणूक विभाग क्रमांक 53 तर निर्वाचक गणाचा क्रमांक 106 अनुसूचित जाती महिला. आठ कोळविहीरे निवडणूक विभाग क्रमांक 54 तर निर्वाचक गणाचा क्रमांक 105 सर्वसाधारण महिला. आरक्षणाबाबत सोडत पद्धतीने नुसार, निश्चित केलेल्या गणाच्या नुसार आहे, जागेबाबत कोणतीही तक्रार असल्याचा आरक्षण प्रसिद्धी झाल्यानंतर, वि हित कालावधीमध्ये हरकती व सूचना दाखल करण्याची माहिती देण्यात आली. व वरील प्रमाणे नुसार पूर्ण प्राधिकृत अधिककारी तथा उपविभागीय अधिकारी पुरंदर वर्षा लांडगे व तहसिलदार विक्रम राजपूत यांनी जाहीर केले. यावेळी गट विकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ ह्या सुद्धा उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments