शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, सासवड येथील विद्यार्थ्यांनी विविध तालुका आणि जिल्हा स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.तालुका स्तरावरीय बुद्धिबळ, खो-खो, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, , कुस्ती, क्रिकेट तायक्वांदो,बॉक्सिंग, स्केटिंग कराटे तसेच ऍथलेटिक्स स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले.१४ वर्षे व १७ वर्षे गटातील विद्यार्थ्यांनी १००, २००, ४०० आणि ८०० मीटर धावणे, गोळाफेक, भालाफेक आदी स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली. जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत श्रावणी श्रीकांत मोहिते हिने प्रथम क्रमांक मिळवून शाळेचा गौरव वाढविला. तसेच तिची पुढील विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेले आहे. जिल्हा किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये कुमार साई राहुल नागरगोजे या विद्यार्थ्याने 35 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून पुढील विभागीय स्पर्धेसाठी त्याची निवड झालेली आहे.कुमारी प्रांजल अरुण शिंदे या विद्यार्थिनीने तालुकास्तरीय 100 मीटर तसेच 200 मीटर धावणे या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून विद्यालयाचा गौरव वाढविला. कुमारी वैष्णवी तानाजी घारे हिने जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त करून उज्वल यश संपादन केले या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक संतोष गलांडे सर यांनी उत्तम मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांच्या या अशाबद्दल विद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती रेणुका सिंग मॅडम उपप्राचार्य सुषमा रासकर मॅडम ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख उज्वला जगताप मॅडम, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख स्वाती जगताप मॅडम तसेच जनसंपर्क अधिकारी अमोल सावंत तसेच शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व अधिकारी व पदाधिकारी यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments