पुरंदर तालुक्यातील सासवड रुग्णालयांमध्ये 3856 बालकांना लस सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन अकमार यांच्या हस्ते उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी शून्य ते पाच वयोगटातील एकूण 3856 बालकांना पोलिओ लस देण्यात आली. यामध्ये मीरा नरसिंग होम, स्वामी समर्थ मंडळ आणि ग्रामीण रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. रुग्णालयाचे एकूण 22 लसीकरण बूथ होते. 13 ऑक्टोंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत घरी जाऊन लसीकरण करण्यासाठी 18 टीम तैनात असून, 100% लसीकरण पूर्ण करण्याची आव्हान डॉ. अकमार यांनी केले आहे. लहान मुलांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना पुढील काळामध्ये कोणत्याही प्रकारची शारीरिक विकलांग येऊ नये, यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. अशी माहिती, डॉ. गजानन अकमार यांनी प्रतिनिधीला ही माहिती दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments