Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील माळशिरस गणामध्ये विजेचा जबरदस्त ताण;तर 22 ठिकाणी ट्रान्सफॉर्मर वाढवण्याची मागणी माऊली यादव यांचे विद्युत मंडळाला निवेदन सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस गणातील वाढत्या विविध ,लोड शेडिंग मुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना वारंवार अडचणीचा सामना करावा लागत असल्याकारणाने, प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून 22 ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसवावेत व विद्यमान यंत्रणा अशी सक्षम करावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य माऊली यादव यांनी निवेदनाद्वारे केली आहे, यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे कार्यकारी अभियंता गवई यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. माळशिरस, राजुरी, पिंपरी ,मावडी, नाझरे सुपे ,नायगाव, रिसे, पिसे पोंढे, पांडेश्वर, नाझरे कडेपठार, रानमळा ,कोथळे ,ढालेवाडी आदी गावांमध्ये वाढत्या विजेच्या तणावामुळे पुरवठा खंडित होणे, होल्टेज कमी जास्त होणे ,अशा समस्या निर्माण झाल्या आहेत, यावर सक्षम असा उपाय म्हणून 15 ठिकाणी 100 केवी क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर वाढवणे आणि सात ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे आवश्यक असल्याचे यादव यांनी नमूद केले आहे ,तसेच अनेक ट्रान्सफॉर्मर चे पियुज बॉक्स खराब झाले असून, ते तातडीने बदलणे गरजेचे आहे अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांना झोळ आल्याने ,शेतामध्ये ऊस लागवड चालू असताना ,ठिणग्या पडून पिकांचे नुकसान होत आहेत, त्यामुळे तारांची दुरुस्ती करून, झोळ काढावेत अशी ही मागणी केली आहे ,नवीन ट्रान्सफॉर्मर आणि दुरुस्ती मुळे वीज पुरवठा अधिक सुरळीत होऊन सिंचन व्यवस्था सक्षम होईल व भविष्यातील वाढत्या मागणीची पूर्तता करणे शक्य होईल, असा विश्वास यादव यांनी व्यक्त केलेला आहे, याबाबत सविस्तर सगळी माहिती त्यांनी प्रतिनिधीला दिली.

Post a Comment

0 Comments