Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील ऑस्करवाडी तलावा मधील दोन तरुणांचा मृत्यू सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील ऑस्करवाडी येथील तलावा मध्ये पोहोण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, ही घटना बुधवारी घडली असून सायंकाळी घडलेली आहे ,पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमेश मोहित चौधरी वय 18 आणि हनुमंत बाबुराव पुजारी वय 19 दोघेही राहणार नगर होस्टेल चौक पुणे आपल्या मित्रासोबत ऑस्करवाडी येथील तलावावर कोणासाठी गेले होते मात्र तिघांनाही पोहता येत नसल्याची माहिती समोर आली आहे, सायंकाळी तलावात आंघोळ करत असताना ,हनुमंत पुजारी याचा पाय घसरून पाण्यात पडला होता, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये प्रथमेश चौधरी पाण्यात उतरला मात्र तोही खोल पाण्यात पडल्याने बुडाला असून ,त्यावेळी त्याचा मित्र साहिल गणेश भवाळ वय 19 राहणार अप्पर इंदिरानगर काही अंतरावर गेला होता ,साहिलने आजूबाजूला मदतीसाठी धाव घेतली मात्र परिसरातील काही युवकांनाही पोहता येत नसल्याने, मदत मिळू शकली नाही त्यानंतर त्याने डायल 112 वर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक कुमार कदम, उपनिरीक्षक आचॅना पाटील ,हवालदार सुहास लाटणे, सचिन किवळे ,तेजस शिवतारे यांनी तातडीने शोधमोहिम सुरू केली असून ,सासवड पोलिसांनी भोर येथील रेकेनयु टीम व पोलीस पाटील सचिन दळवी,ऑस्करवाडी चे मनोहर पायगुडे ,गणेश दळवी, परशुराम पायगुडे मदतीने दोन्ही तरुणांना तलावातून बाहेर काढले, असता त्यांना तातडीने सासवड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले ,या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यामध्ये याबाबत नोंद करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments