Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपरिषदेची थकबाकी दारावर कडक कारवाई सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: शहराच्या विकासासाठी आणि नागरी सुविधा अखंडित ठेवण्यासाठी सासवड नगर परिषदेने घरपट्टी आणि पाणीपट्टीची मोठी थकबाकी असलेल्या मालमत्ता धारका विरुद्ध मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली धडक वसुली मोहीम हाती घेतलेली आहे. यामध्ये 25,000 पेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्यांची नळ जोड खंडित करण्यास सुरुवात झाली असून, बड्या थकबाकीदार यांचे गाळे सील करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे, नगर परिषदेकडून वसुलीसाठी पाच विशेष पथके कार्यरत करण्यात आलेली आहेत, शहरात सध्या 444 मालमत्ता धारक असे आहेत ,ज्याची थकबाकी २५ हजार रुपयांच्या वर आहेत, तर 64 जणांची थकबाकी एक लाख रुपयांच्या ही पुढे गेलेली आहे ,अशा सर्व बड्या थकबाकी दारावर पालिकेने कायदेशीर कारवाई सुरू केली असल्याचे मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांनी सांगितले आहे. वारंवार सूचना देऊन एक कर न भरणाऱ्या नागरिकांची नावे आता शहरातील मुख्य चौकातील डिजिटल फलकावर प्रसिद्ध केली जाणार आहेत, केवळ नळ जोडून कापून न थांबता मालमत्ता जप्त करणे सील ठोकणे आणि जप्त मालमत्तेची विक्री करणे अशी कठोर पावले पालिका उचलणार असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.सासवड नगर परिषदेची सुट्टीच्या दिवशीही कर भरणा सुरू नागरिकांच्या सोयीसाठी शनिवार आणि रविवार देखील नगरपरिषद कार्यालयात कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, तसेच नागरिक ऑनलाईन पद्धतीने आपला थकीत कर भरू शकतात, शहराचा विकास हा नागरिकांच्या करावर अवलंबून असतो, त्यामुळे कायदेशीर कारवाई नळजोड खंडित करणे किंवा मालमत्ता सील करणे यासारखी कटू पावले उचलण्यापूर्वी नागरिकांनी स्वतःहून घरपट्टी व पाणीपट्टी भरून सहकार्य करावे डॉक्टर कैलास चव्हाण मुख्याधिकारी सासवड नगर परिषद.

Post a Comment

0 Comments