Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील पिसे येथील पाणीटंचाई टँकरची मागणी पुरंदर पंचायत समितीकडे; तर चोपणाचा तलावा मधील शेतकरी वर्गाने परवानगी नसताना शेतीसाठी पूर्ण तलाव रिकामा केला सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : पिसे तालुका पुरंदर येथील चोपणाचा तलाव येथील मागील फेब्रुवारी ते एप्रिल मे 2025 मध्ये गाळ काढून पूर्ण तलाव हा भरगच्च हा जुलै महिन्यात भरलेला होता, परंतु गाळ काढताना ग्रामसेविका व सरपंचांनी ग्रामसभा, शेतकरी गाव पातळीवर, सदस्य यांना कोणालाही न विचारता मनमानी कारभार करून, गावातील सामाजिक कार्यकर्ते शेतकरी संतोष राजाराम मुळीक यांनी 16 ते 20 जणांचे तीन महिन्यामधील गाळ काढताना कंपनीच्या सदस्याच्या नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचे जेवण तीन महिने पुरवली त्यातील, काही रक्कम निवडक शेतकऱ्यांनी रक्कम संतोष मुळीक यांची जमा केली, तर ग्रामपंचायतीने सुद्धा दहा हजार रुपयाचा चेक एकदा ग्रामसेविका व सरपंच यांनी काढला होता परंतु त्यानंतर 62 हजार रुपये बिल दहा महिने ते बारा महिने झाले अद्याप पर्यंत त्याचा व्यवहार पूर्ण केलेला नाहीत,ग्रामसेविका व सरपंच यांच्याशी व्यवहार असताना सुद्धा आत्तापर्यंत 62 हजार रुपये बिल सर्वसामान्य शेतकरी संतोष मुळीक याचे बील जमा नाहीत. शेतकरी संदिप गणपत मुळीक, देवानंद कड, संजय निवृत्ती चव्हाण यांनी खाजगी मालमत्ता असताना माजी उपसरपंच शांताराम मारुती मुळीक या शेतकऱ्यांनी या व्यक्तीकडून रक्कम घेऊन परवानगी दिली, यामध्ये भूमी अभिलेखची मोजणी झाली नाही, लघुपाटबंधारे विभाग कोणतीही नोंदणी झालेली नाही, आता जी परिस्थिती पाण्याची झाली आहे त्या तीन विहिरी शेतकऱ्यांच्या आहेत, त्यात जास्त खोल असणारी वीर ही ग्रामपंचायतकडे वर्ग करण्यासाठी लघुपाटबंधारे विभाग, गट विकास अधिकारी, तहसीलदार यांनी अधिसूचना देऊन, विहिरी अधिकृत करावी, बाकी दोन विहिरी परवानगी घेतली नाही, त्यामुळे नोंद तलाठी व मंडल अधिकारी यांनी करू नये, तसेच भूमी अभिलेखने मोजणी करून ती जागा लघुपाटबंधारे विभागाकडे वगॅ करावी, त्या ठिकाणी कारण तलाव पूर्ण भरलेल्या असताना, पाणी उपसा केल्यामुळे गावावरची परिस्थिती ओढवली आहे, ती तीन शेतकऱ्यांमुळे परिस्थिती झालेली आहे, त्याला सर्वस्वी जबाबदार तीन विहिरी मालक आहेत, त्यासाठी 62 हजार रुपयाची बिल अदा करावे, लघु पाटबंधारे यांची परवानगी घेतल्याशिवाय पाणी उपसा करू नये, एक विहीर खोल असलेली पिसे ग्रामपंचायतकडे वर्ग करावी, तर राहिलेल्या दोन विहिरी नोंद करू नये, परंतु परवानगी असल्याशिवाय पाणी उपसा करू नये ,म्हणून यावर पाणीटंचाई असताना टँकरची जर पिसे गावाला गरज असताना, 23 ,24, 25 मार्च गावची जत्राच रोजी असताना गटविकास अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद यांनी तीन विहिरीवर माजी उपसरपंच, ग्रामसेविका, सरपंच यावर कारवाई करून 62 हजार रुपयाची बिल काढून देण्यास सहकार्य करावे, व एक विहीर पिसे ग्रामपंचायतकडे वर्ग करून जो गावासाठी विहिरीचा निधी मंजूर झाला आहे तो खोल असणाऱ्या विहिरीवाल्याकडे वर्ग करून गावाची पाण्याची सोय करावी, जेणेकरून टँकरची मागणी होणार नाही ,याची दक्षता ही त्वरित गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हा परिषद, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनी योग्य ती कार्यवाही त्वरित करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे, अशी माहिती प्रतिनिधीला देण्यात आली.

Post a Comment

0 Comments