Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील श्रीनाथ म्हस्कोबाच्या मुखवट्यांना स्नान तर श्री शेत्र वीर येथे चंद्रग्रहण काळातील धार्मिक विधी पूर्ण गंगा नदीवर पूर्ण सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्री शेत्र वीर तालुका पुरंदर येथे चंद्रग्रहण काळामध्ये श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व आई देवी जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्तींना पूर्ण गंगा नदीमध्ये स्नान घालण्यात आले, यावेळी देवाचे मानकरी, साल करी ,दागीनदार ,ग्रामस्थ व देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित असल्याचे देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मोहन धुमाळ यांनी सांगितले .पहाटे महापूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला, सकाळी सहा वाजता भाविकासाठी दर्शनासाठी खुला करण्यात आला ग्रहण स्पर्श करून दुपारी तीन वाजून वीस वेद लागले होते ,वेद सुरू झाल्यानंतर देऊळ वाड्याच्या दक्षिण दरवाज्याने श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व आई देवी जोगेश्वरी यांचे मुखवटे पूर्ण गंगा नदीमध्ये स्नानासाठी नेण्यात आले, सायंकाळी 6:48 ग्रहण मोक्ष झाल्यावर ,पुन्हा देवाच्या मुखवट्यांना पूर्ण गंगा नदीमध्ये स्नान घालून विधिवत पूजा करण्यात आली ,ग्रहण स्पर्श झाल्यापासून ते ग्रहण मोक्ष होईपर्यंत दगडी कासवावर गोसावी मंडळीचा पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम चालू होता ग्रहण काळामध्ये मंदिराच्या मुख्य गाभारा दर्शनासाठी बंद केला होता, ग्रहणाच्या पूर्व नियोजन बैठक आयोजित करूनच नियोजन केल्याचे विश्वस्त मंडळ यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments