Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील बेकायदा हुक्का पार्लरचा सासवड या ठिकाणी सुळसुळाट सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील फोफावलेल्या बेकायदा हुका पार्लर मुळे तरुण पिढी उध्वस्त होत असून ,हे प्रकार तातडीने बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बहुजन हक्क परिषदेच्या वतीने देण्यात आलेला आहे ,या संदर्भात परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष डुबल,सचिव कैलास धिवार, अजिम आतार यांनी सासवड पोलीस स्टेशनला हे निवेदन दिलेले आहे ,निवेदनात नमूद केल्यानुसार सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील छुप्या पद्धतीने बेकायदा हुका पार्लर सुरू आहेत ,या ठिकाणी शाळकरी मुले व college साठी तरुण जात असून व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे, यामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक आणि सामाजिक नुकसान होत असून, गोरगरीब पालकांचे संसार उघड्यावर येत आहेत ,या हुक्का पार्लरमुळे परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली असून ,'आम्हाला भीक नको तर राज्यघटने दिलेले हक्क हवेत 'अशी भूमिका मांडत बहुजन हक्क परिषदेने पोलिसाकडे कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे संबंधित हुक्का पार्लरवर तातडीने छापे टाकून ते कायमचे बंद करावेत ,अशी मागणी केली आहे जर पोलिसांनी या बेकायदा धंद्यावर वेळीच लगाम घातला नाही तर ,स्थानिक नागरिकांच्या मदतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा ही इशारा बहुजन हक्क परिषदेच्या वतीने देण्यात आलेला आहे.

Post a Comment

0 Comments