Hot Posts

6/recent/ticker-posts

"कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर उत्साहात संपन्न" सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय ( Cummins College of Engineering for Women) पुणे यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दि. २४ फेब्रुवारी २०२६ ते २ मार्च २०२६ या कालावधीत पुरंदर तालुक्यातील मु. पो. एखतपूर–मुंजवडी येथे यशस्वीरीत्या संपन्न झाले.शिबिराची सांगता उत्साहपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाने करण्यात आली. स्वयंसेविकांनी गणेश वंदना, भक्ती नृत्य आणि पथनाट्य सादर करून कार्यक्रमात चैतन्य निर्माण केले.समारोप प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. शुभांगी चौधरी यांनी शिबिरातील विविध उपक्रमांचा आढावा घेतला. या साप्ताहिक शिबिरामध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले.स्वयंसेवकांनी गावच्या भंडाऱ्यात जेवण वाढण्याचे सेवा कार्य केले तसेच कावड यात्रेसाठी रांगोळी काढण्यात सहभाग नोंदवला. ग्रामस्वच्छता व श्रमदान, ग्राम कुटुंब सर्वेक्षण आणि शाळा परिसर स्वच्छता असे उपक्रम राबविण्यात आले. माध्यमिक शाळेत पाणी व्यवस्थापन व शाश्वत विकास विषयावर व्याख्यान देण्यात आले तसेच पाणी व्यवस्थापन व व्यसनमुक्ती जनजागृती फेरी काढण्यात आली. प्लास्टिक पुनर्वापर सत्रामध्ये कापडी पिशव्या व इको-ब्रिक यांची माहिती देण्यात आली. प्राथमिक शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन व बक्षीस वितरण करण्यात आले आणि विद्यार्थ्यांसोबत झुंबा उपक्रमही घेण्यात आला. याशिवाय “गडकिल्ले – ऐतिहासिक वारसा” या विषयावर व्याख्यान,प्राथमिक शाळेत वैज्ञानिक प्रयोग, मराठी गौरव दिन साजरा करणे, झाडांना पाणी देणे तसेच आरोग्य शिबिरामध्ये ग्रामस्थांसाठी मधुमेह तपासणी, नेत्र तपासणी, रक्तदाब तपासणी व इतर आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या.तसेच ग्रामस्थांना “मेरी ग्रामपंचायत” अँप इंस्टॉल करण्याचे मार्गदर्शन करून त्याच्या वापराबाबत माहिती देण्यात आली. तसेच ममता बाल सदनास भेट व गावचा इतिहास जाणून घेतला. ज्यास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.समारोप कार्यक्रमासाठी एखतपूर–मुंजवडी गावाच्या सरपंच शितल टिळेकर, उपसरपंच रेश्मा मुलानी, माजी उपसरपंच तुषार झुरंगे,सदस्य विद्या झुरंगे, कृषी बाजार समितीचे उपसभापती महादेव नाना टिळेकर, विद्या निंबाळकर ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा देवकाते सर, शिवशंभो माध्यमिक शाळेचे शिक्षक ठोंबरे सर , डॉ .निनाद खळदकर तसेच ग्रामपंचायत कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.विद्यार्थी प्रतिनिधी कु. आर्या कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. माधुरी खांबेटे यांनी आपल्या भाषणात निस्वार्थीपणा, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका यांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रम अधिकारी डॉ. शुभांगी चौधरी यांनी सर्व ग्रामस्थ, मान्यवर व सहकार्य करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.हे शिबिर प्राचार्या डॉ. माधुरी खांबेटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. शुभांगी चौधरी, शशिकांत सोमण, अजय पुरंदरे, समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने उत्तमरीत्या पार पडले. ग्रामविकास, सामाजिक बांधिलकी आणि शाश्वत जाणीव दृढ करणारे हे शिबिर विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी व संस्मरणीय ठरले.

Post a Comment

0 Comments