पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे संगणक कक्षाचे उद्घाटन व विज्ञान दिन उत्साहात साजरा. ण सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आपले कौशल्य विकसित करावे : अभयकुमार साळुंखे सासवड येथील पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानच्या विद्यमाने अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असा ५० संगणकांचा संगणक कक्ष उभारण्यात आला असून त्याचे उद्घाटन मा.अभयकुमार साळुंखे कार्याध्यक्ष, श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर यांच्या शुभहस्ते पार पडले. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रीय विज्ञान दिन देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर संगणक कक्षाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. नव्याने उभारण्यात आलेल्या या संगणक कक्षात ५० अत्याधुनिक संगणक, इंटरनेट सुविधा, प्रोजेक्टर तसेच आवश्यक तांत्रिक साधनसामग्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यावेळी बोलताना अभयकुमार साळुंखे यांनी डिजिटल युगात संगणक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आपले कौशल्य विकसित करावे, असे आवाहन त्यांनी केले. स्व. एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानच्या या स्तुत्य उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयक घोषवाक्ये देत वातावरण उत्साही केले. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून विज्ञान दिन साजरा केला. या उपक्रमामुळे परिसरात आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. मनोगत व्यक्त करताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप यांनी सांगितले की, आधुनिक शैक्षणिक सुविधा व वैज्ञानिक दृष्टीकोन या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहेत. संगणक कक्षामुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान मिळणार असून भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षांसाठी त्यांना मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर संगणकीय शिक्षण घेण्यासाठी प्रतिष्ठान मार्फत गरजू विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य सुद्धा करण्यात येणार आहे.कार्यक्रमास प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप, प्राचार्य इस्माईल सय्यदसर,अरुणआप्पा जगताप माजी संचालक सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, रावसाहेबआण्णा पवार ज्येष्ठ साहित्यिक, सुयश इन्फोटेक चे चैतन्य भोसलेसर,साक्षी मेमाणे, शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments