पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी सुनेत्राा पवार; 85 वर्षांमध्ये पहिल्यांदाच महिला अध्यक्ष सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : पुणे जिल्हा शिक्षण मंडळच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सर्वानुमती निवड करण्यात आली आहे, संस्थेच्या मुख्य कार्यालयात रविवारी दिनांक एक मार्च रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे, संस्थेच्या 85 वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथमच महिला अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला आहे , 2006 पासून अध्यक्ष पदाची पवार सांभाळणारे अजित पवार यांच्या 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातातील निधनानंतर हे पद रिक्त होते, सभेच्या प्रारंभी अजित पवार विमानातील अंगरक्षक व वैमानिक यांना श्रद्धांजली वाह्यात आली ,त्यानंतर मानदसचिव एडवोकेट संदीप कदम यांनी सुनेत्रा पवार यांच्या निवडीचा ठराव मांडला .उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते मंजूर करण्यात आला मंडळाच्या अखत्यारीमध्ये 16 पर्व, प्राथमिक सोळा, प्राथमिक 56, माध्यमिक ,व 31 उच्च माध्यमिक शाळा कार्यरत आहेत ,23 ठिकाणी व्यावसायिक अभ्यासक्रम, 8 पारंपरिक महाविद्यालय तसेच फार्मसी ,एमबीएला आयुर्वेद ,अभियांत्रिकी व आर्किटेक्चर महाविद्यालय चालतात, सुमारे 84 हजार विद्यार्थी व 3697 शिक्षकीय तर कर्मचारी संस्थेत कार्यरत आहेत, अजित पवार यांच्या कार्यकाला मध्ये डिजिटल स्टुडिओ अट्टल टिकरींग लॅब संशोधन प्रोत्साहन कौशल्य विकास क्रीडा महोत्सव यासारखे उपक्रम राबवण्यात आले, दहावी बारावी निकालात संस्थेने सातत्याने आघाडी घेतली आहे आता सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीस नवे बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे, यावेळी संस्थेचे खजिनदार एडवोकेट मोहनराव देशमुख, उपसचिव एल .एम. पवार ,सहसचिव ए .एम जाधव यांच्या संस्थेचे आजीव सभासद उपस्थित होते, एल एम पवार यांनी आभार मानले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments