Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील दत्तात्रय फडतरे संगीत गौरव पुरस्काराने सन्मानित सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : पुरंदर तालुक्यातील सासवड येथील सोपानगर येथे असलेल्या संगीत विद्यालयात दत्तात्रय (तात्या) दगडू फडतरे यांना मेघ मल्हार संगीत विद्यालयाच्या वतीने संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामासाठी 'संगीत गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. मेघ मल्हार संगीत विद्यालय यांच्या वतीने दिलेल्या पुरस्कार प्रदान कार्यक्रम प्रसंगी ख्यातनाम तबलावादक पंडित उमेश मोघे, यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी पंडित उमेश मोघे, तसेच सिद्धेश्वर मारटकर, सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य प्रसाद खाडे, मेघ मल्हार विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष अमोल बेलसरे, यशवंत महाराज भोसले, श्रीकांत जाधवराव, संगीत विशारद मच्छिंद्र दीक्षित चंदुलाल तांबोळी, अनिकेत भोसले, श्रीनाथ वनारे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments