Hot Posts

6/recent/ticker-posts

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पायी पालखी सोहळा , 2026, वर्ष - 12 वे सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: दि.11माचॅ रोजी महालक्ष्मी लोन्स वनपुरी पुरंदर येथे पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठीची आढावा बैठक संपन्न झाली , आढावा बैठकीमध्ये गेल्या बारा वर्षांपासून अविरत चाललेल्या धर्मवीर छत्रपती श्री शंभूराजेंचा जन्मस्थळ दुर्ग पुरंदर ते समाधिस्थळ धर्मपंढरी श्री क्षेत्र तुळापूर- वढू बु. असा प्रवास नित्यवर्षीने होत असतो , या वर्षी हा सोहळा दि. 15 मार्च ते दिनांक 18 मार्च 2026 रोजी तुळापूर - वढू बु. येथे सांगता होणार आहे. सकाळी 9.00 वाजता दत्त मंदिर नारायणपूर ( पुरंदर ) येथुन् प्रस्थान करून सासवड येथील कालभैरवनाथ मंदिर येथे 12 ते 4 वाजेपर्यंत विसाव्यासाठी थांबणार असून, दुपारी 4 वाजता विसाव्याच्या ठिकाणाहून निघून संध्याकाळी 7 वाजता काळेवाडी येथील श्रीराम मंदिरात मुक्कामसाठी थांबणार असून, ह्या ठिकाणी गुरुवर्य श्री संदीपराज महिंद गुरुजी यांचे शंभूराजेंच्या जीवन चरित्रावर व्ह्याख्यान होणार आहे .दि. 16 मार्च रोजी सकाळी 8.30 पालखी सोहळ्याचे प्रस्थान काळेवाडी येथे होऊन दिवे घाट मार्गे वडकी, देवाची उरुळी या ठिकाणी हा सोहळा विसावा तसेच लोणीकाळभोर येथे दुसऱ्या दिवशीच्या मुक्कामसाठी जाणार आहे. दि. 17 मार्च रोजी पालखी सोहळा लोणी काळभोर येथून प्रस्थान करून, थेऊरगाव कोलवडी येथे विसाव्याला जाणार आहे, त्या दिवशी पालखी सोहळा लोणीकंद येथे मुक्कामास असणार आहे, तसेच दि. 18 मार्च म्हणजेच धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पुण्यतिथी ( फाल्गुन अमावस्या ) दिवशी धर्मपंढरी श्री क्षेत्र तुळापूर - वढू बू येथे पालखी सोहळ्याची सांगता होणार आहे.या पालखी सोहळा आढावा बैठकीसाठी पालखी सोहळ्याचे अद्यक्ष सचिन पलांडे , सरचिटणीस भाऊसो शिंदे, पालखी सोहळ्याचे पुरंदर तालुक्यातील संचालक पै.सागर काळे, अमित पवार, प्रशांत वांढेकर, शिवतेज काळे, सदानंद बोरकर, विश्वास जगताप उपस्थित होते , तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य हरिभाऊ लोळे, अजय इगले, प्राजक्ता दुर्गाडे, पंचायत समिती सदस्या अर्चनाताई कटके,सायली शिदे यांचे (पती मनोज शिदे) पत्रकार , शंभूराजे युवक कार्यकर्ते, अनेक मान्यवर ,पुरंदर तालुक्यातून उपस्थित होते.सर्व मार्गदर्शक वक्त्यांनी पालखी सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने पुरंदरकरांनी दिवे घाटापर्यंत या सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला.. शेवटी आभार प्रदर्शन निलेश काले यांनी मानले.

Post a Comment

0 Comments