यात्रा काळामध्ये भाविकांना सुविधा पुरवल्या जातील; तर शिखर शिंगणापूर येथे बैठकीत उपविभागीय अधिकारी उज्वला गाडेकर यांची माहिती सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्री शेत्र शिखर शिंगणापूर तालुका माण जिल्हा सातारा येथील चैत्र यात्रेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येत असतात, अशावेळी भाविकांना रस्ता, आरोग्य, वीज, पाणी, एसटी बस यासारख्या वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्व सुविधा पुरविला जाणार असल्याचे, माण खटाव च्या उपविभागीय अधिकारी उज्वला गाडेकर यांनी सांगितले. कावडधारक तथा भाविकांनी यात्रेवेळी येणारे समस्या मांडल्या, याबाबत सर्व समस्यांचे निराकरण करत सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थितीमध्ये 17 मार्च रोजी पुन्हा बैठक होणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले ,शिखर शिंगणापूर येथे होणाऱ्या चैत्र यात्रेनिमित्त ग्रामपंचायत सभागृहात यात्रेच्या विभागीय अधिकारी गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या, यात्रेमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य कावडी शंभू महादेवाला जलाभिषेक करण्यासाठी येतात, याच परंपरेतून पुरंदर तालुक्यातील सासवड, खळद, पंचक्रोशी शिवरी, बेलसर, यांच्यासह अन्य गावांच्या कावडी यात्रेत सहभागी होतात, यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी रणजीत सावंत, तहसीलदार विकास अहिर, गटविकास अधिकारी प्रदीप शेडगे, फलटण सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जगताप, दहिवडी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, पंचायत समिती सदस्य राजाराम बोराटे, देव व्यवस्थापक मंदार पत्की, खळद पंचक्रोशीच्या कावडीचे मानकरी शिवयोगी संत भूतोजी नाना खळदकर, सासवड कावडीचे मानकरी कैलास बुवा कावडे, बबनराव कामठे, रवींद्र फुले, निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे ,अन्नसुरक्षा अधिकारी कल्पना गायकवाड, सातारा यांच्यासह भाविक भक्त उपस्थित होते. सूत्रसंचालन आभार शिंगणापूर यात्रा कमिटीचे अध्यक्ष तथा उपसरपंच डॉक्टर अतुल बंदुके यांनी केले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments