Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील भिवडी येथील विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: भिवडी तालुका पुरंदर येथील शेवग्याच्या झाडाची फांदी तोडताना विजेच्या तारेचा करंट लागून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी असा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दिनांक 11 रोजी दुपारी 1:40 वाजता मिळालेल्या माहितीनुसार श्यामराव रघुनाथ काळे वय 60 राहणार भिवडी तालुका पुरंदर हे दुपारी दीड वाजायच्या सुमारास शेतातील शेवग्याच्या झाडाची फांदी तोडत होते, यावेळी तोडलेली फांदी शेतातून गेलेल्या वीज वाहिनीच्या तारेवर पडल्याने, त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला, करंट लागल्याने, ते झाडाखाली कोसळले घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी तातडीने त्यांना रुग्णवाहिकेतून सासवड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची घोषित करण्यात आले या घटनेची माहिती नातेवाईक अरुण किसन चौधरी राहणार भिवडी यांनी सासवड.पोलिसांमध्ये ही खबर दिली असून, दरम्यान अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे भिवडी परिसरामध्ये हळू व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments