Hot Posts

6/recent/ticker-posts

जागतिक महिला दिन उत्साहात साजरा सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : एम. ई. एस. इंग्लिश मिडीयम स्कूल, सासवड येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली. प्रास्ताविकामध्ये सरोज जांगडा यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर-नागनूर यांनी मुख्याध्यापकीय मनोगत व्यक्त करताना महिलांचे समाजातील योगदान आणि त्यांची विविध क्षेत्रांतील प्रगती याबद्दल मार्गदर्शन केले.कार्यक्रमात शिक्षिका नीता जगताप, रुचिरा गार्डी तसेच विद्यार्थिनी साजिरी माने यांनी आपले मनोगत व्यक्त करून महिला सशक्तीकरणाबद्दल विचार मांडले.या प्रसंगी शाळेतील सर्व महिला शिक्षिकांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सुंदर व प्रभावी सूत्रसंचालन भाऊसाहेब येळे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन माननीय मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर- नागनूर यांच्या मार्गदर्शनाखाली अंकिता जगताप,अंकिता कुंजीर, नितीन ठोंबरे व भाऊसाहेब येळे यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी अंकिता जगताप यांनी आभार प्रदर्शन करून उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Post a Comment

0 Comments