Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यामध्ये संत बुतोजीबुवा तेली यांच्या कावडीचे सासवड मधून प्रस्थान; ढोल ताशांचा गजर तर शिवभक्तांचा जयघोष फटाक्याची आतषबाजी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: शिखर शिंगणापूर यात्रेमध्ये प्रथम मानाची कावड असलेल्या सासवड तालुका पुरंदर येथील संत भूतोजी बुवा तेली यांच्या मानाच्या कावडीचे गुरुवारी दिनांक 26 रोजी श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर प्रस्थान झाले, रात्री उशिरा हजारो शिवभक्तांच्या जयघोष यामध्ये फटाक्यांच्या आतसबाजी मध्ये पारंपारिक वाद्याच्या गजरांमध्ये आणि भक्तिमय वातावरणामध्ये ही कावड संध्याकाळी 7:30 वा प्रस्थान ठेवले. शेत्र शिखर शिंगणापूरकडे कैलास बुवा कावडे यांच्या मार्गदर्शनाखाली रवाना झाली .चैत्रशुद्ध बार्शीला शिखर शिंगणापूर येथे मोठी यात्रा भरत असते, यात्रेपूर्वी महाराष्ट्राच्या विविध भागातून कमीत कमी 800 ते 900 कावडी महादेवाला पाण्याची धार घालण्यासाठी येत असतात, यामध्ये सासवडच्या संत भुतोजी बुवा तेली यांच्या कावडीला प्रथम मान आहे, सासवडच्या कावडीतील करहेच्या पाण्याची धार शिवलिंगावर पडल्यानंतरच या यात्रेची सांगता होते, की कावड आकाराने सर्वात मोठी असून, अत्यंत अवघड असा मुंगी घाट केवळ मानवी हाताच्या साखळीने सर करणारी ही एकमेव कावड मानली जाते, प्रस्तावनापूर्वी बुधवारी रात्री गाव पाटील संग्राम जगताप यांच्या वाड्यावर व नियोजनाची बैठक पार पडली. गुरुवारी सकाळी पूजा अर्चा झाल्यानंतर धान्य बाजारातील शिवरायासमोरील श्री दत्त मंदिरासमोर कावड भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली होती, सायंकाळी 7:30 वाजता माजी आमदार संजय जगताप, गाव पाटील संग्राम जगताप, आणि शिवयोगी कैलास बुवा कावडे यांच्या हस्ते कावडीची आरती करण्यात आली. यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे, कावड मंडळाचे अध्यक्ष संजय जगताप, काळभैरवनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष रमेश (कारभारी) जगताप, रवींद्रपंत जगताप, संजय चव्हाण, साकेत जगताप ,बंडूकाका जगताप ,बाळासाहेब भिताडे, उदय जगताप, विलास जगताप, गणेश कुदळे ,मंगेश कावडे,ऋषिकेश जगताप ,अनिकेत जगताप ,गौरव जगताप ,अभिजीत शिवरकर, आदी उपस्थित होते .रात्री उशिरा कावड वाजत गाजत जेजुरी नाक्यावर आली तेथून संत भुतोजी बुवा तेली यांच्या समाधीला पाच प्रदक्षिणा घालून कावड जेजुरी मार्गे कोळ विहिरीकडे ,मार्गस्थ झाली चार दिवसाच्या प्रवासानंतर सोमवारी दिनांक 30 रोजी ही कावड मुंगी घाटातून वर चढून शिंगणापूरच्या शिवलिंगाला पारंपरिक धार घालण्याच्या मुख्य सोहळा पार पडणार आहे, कावडीला निरोप देण्यासाठी सासवड शहरातील हजारो शिवभक्त व महिला यावेळी आदी नागरिक उपस्थित होते. सोमवारी दिनांक 30 रोजी उशिरा करा नदीच्या पवित्र जलाने महादेवाला जलधार अर्पण करून यात्रेचे सांगता होणार आहे, यावेळी श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या वतीने मंदार पत्की यांच्या हस्ते मानाची सवयी ,35 हात ध्वज, पागोटे ,बेल, दावणा, पाच नारळ व तोरण असा पारंपारिक मानपान देण्यात येणार असल्याची माहिती कावडीचे प्रमुख कैलास महाराज कावडे यांनी प्रतिनिधीला ही माहिती दिली.

Post a Comment

0 Comments