पुरंदर तालुक्यात सासवड या ठिकाणी उपबाजारात ज्वारीला प्रतिक्विंटला 3800 दर; तर गहू प्रतिक्विंटला 3300 दर सासवड प्रतिनिधी: पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड (ता. पुरंदर) येथील उपबाजारामध्ये धान्याचे मोठ्या प्रमाणामध्ये आवक होत असते, बुधवार( दि. 13 ऑगस्ट) रोजी ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 3 हजार 800रु चा दर , तर गहू प्रतिक्विंटला 3हजार 300चा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उपबाजारात वाघापूर, माळशिरस, गराडे, दिवे, परिचे, वाल्हे, राजुरी या सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी घेऊन, तांदूळ हरभरा असे धान्य विक्रीसाठी येत असतात, बुधवारी सासवड उप बाजारात एक नंबरचा ज्वारीला कमाल 3 हजार 800 रुपये तर दोन नंबर प्रतीच्या ज्वारीला किमान 2 हजार 650 रुपये तर सरासरी 3 हजार 225 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला, तर गहू कमाल 3 हजार 300 रुपये तर दोन नंबर प्रतीच्या गहू किमान 2 हजार 800 रुपये तर सरासरी 3 हजार 050 रुपये प्रतिक्विंटला असा दर मिळाला अशी समितीचे सचिव मिलिंद जगताप यांनी माहिती दिली. सासवडच्या उप बाजारातील धान्य आवक दर प्रतिक्विंटल पीक, किमान, कमाल, सरासरी दर ज्वारी 2650,3800, 3225. बाजरी 2600,3200,2900. गहू 2800,3300, 3050. तांदूळ 4000,5200,4600. - - (, हरभरा 5900,6011, 5955. यावेळी सभापती संदिप फडतरे, उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, गणेश होले, देविदास कामठे, वामन कामठे, अनिल माने, अशोक निगडे, भाऊसो गुलदगड, पंकज निलाखे, लिपिक विकास कांबळे यांच्यासह व्यापारी आर. के टेडरचे रूपचंद कांडगे, आर. आर. ट्रेडरचे राजेंद्र जालिंद्रे, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, शैलेश वीरकर, आदी उपस्थित होते. गुळाची आवक आणि दर क्विंटल पीक किमान कमाल सरासरी दर गुळ 4350,4525,4437. दरम्यान, गुळ बाजारात गुळाची आवक 683 बॉक्स म्हणजे 136 क्विंटल असल्याची माहिती सहसचिव नितीन किकले, कृष्णात खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी दिली. यावेळी गुळ व्यापारी शांतीकुमार कोठडिया उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
YouTube channel
Most Popular
FM RADIO 📻
FM Code
FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा
0 Comments