Hot Posts

6/recent/ticker-posts

एम.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूल प्रशालेतील विद्यार्थ्यांनी बनविला शाडू मातीपासून गणपती.... सासवड प्रतिनिधी:पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने एम.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूल सासवड प्रशालेत शाडू मातीपासून गणपती तयार करण्याची कार्यशाळा संपन्न झाली. गणेशोत्सवात पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन मा.मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर- नागनूर यांच्या हस्ते करण्यात आले. श्री भाऊसो येळे यांच्या प्रास्ताविकाने कार्यशाळेत सुरुवात झाली, पर्यवेक्षिका सरोज मॅडम यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.सासवड परिसरातील नामांकित योगाचार्य श्री.घनश्याम खांडेकर यांनी प्रशालेच्या सुमारे १०० विद्यार्थ्यांना गणपतीची मूर्ती तयार करण्याचे मार्गदर्शन प्रत्यक्षिकाद्वारे केले. सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः गणेश मूर्ती बनवण्याचा आनंद घेतला. त्याच बरोबर याच मूर्तीची आपल्या घरी स्थापना करण्याचा देखील निश्चय केला, जेणेकरून जलप्रदूषण कमी करण्यास मदत होईल हा त्या मागचा उद्देश होता. मुलांसोबत सर्व शिक्षकांनी देखील गणेश मूर्ती तयार केली. कार्यक्रमाच्या प्रमुख प्रतीक्षा बोळगे यांनी यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा असे आवाहन केले व स्वाती पांढरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments