Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील हॉटेल बंद प्रकरणाचा शिंदेसेनेकडून निषेध; तर सासवड पालिकेवर शिवसेनेचा काढलेला निषेध मोर्चा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक व पुरंदर प्राईम न्यूज: सासवड शहरातील लांडगे आणि परिसरातील गेल्या अनेक वर्षापासून डेनेज व्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला होता प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांना नरक यातना या सहन कराव्या लागत होत्या, ड्रेनेज लाईन रस्त्यावर साचणारे सांडपाणी आणि पसरलेली दुर्गंदी यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते, या गंभीर समस्येचा फटका थेट स्थानिक व्यापाऱ्यांना बसत होता, काही व्यापाऱ्यांना आपले व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आलेली होती, सासवड लांडगे आळी येथील मोहिनी हॉटेल बेकायदेशीर रित्या बंद केल्याच्या घटनेचा निषेध करून, शिंदे शेना सासवड शहर शाखा व नवनिर्वाचित नगरसेवकाने अंगावर निषेदाचे फलक घालून, सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण व सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांना निवेदन देण्यात आले, सासवड शहर शिंदेशेना अध्यक्ष मिलिंद इनामके व नवनिर्वाचित विरोधी गटनेते मंदार गिरमे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेतील शिंदे सेनेचे सर्व नगरसेवक यावेळी उपस्थित होते, यावेळी शिंदेशेना गटनेते मंदार गिरमे, शहर शिंदेशेना अध्यक्ष मिलिंद इनामके, नगरसेवक बाळासो भिंताडे, प्रितम म्हेत्रे, राजाभाऊ टकले, तेजस राऊत, अक्षराज जगताप, संदीप जगताप, सौरभ म्हेत्रे, माजी नगरसेवक चंदू गिरमे, अंकुश शिवरकर, बिट्टू माने, अजित चौखंडे, मंगेश भिंताडे, मनीष रणपिसे, बंटी माने, राजू शिंदे, सुनील पवार आदी उपस्थित होते. सासवड नगर परिषदेत एकीकडे नवनियुक्त नगराध्यक्ष आनंदी (काकी )जगताप यांचा पदग्रह सोहळा पार पडत असताना, दुसरीकडे विरोधी शिंदेचे नऊ नवनिर्वाचित नगरसेवकांनी अंगावर निषेदाचे फलक घालून, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांना घेराव घालून, निवेदन देण्यात आले, सासवड येथील हॉटेल बेकायदेशीर रित्या बंद केल्याच्या घटनेचा निषेध करत, शिंदे सेना सासवड शहर शाखा व नवनिर्वाचित नगरसेवकांनी अंगावर निषेदाचे फलक घालून, नगरपालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला, शहरातील ड्रेनेज कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला नाही, तो पूर्ण झाल्यानंतर, दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात करण्यात येईल, गुरुवारी लांडगे आळीतील नागरिकांच्या तक्रारीनंतर, आम्ही स्थळ पाणी व पंचनामा केला, हॉटेल बंद ठेवण्याच्या कोणत्याही सूचना दिलेल्या नव्हत्या. डॉ. कैलास चव्हाण मुख्याधिकारी सासवड नगरपरिषद.

Post a Comment

0 Comments