Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील खानवडी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण; तर ग्रामपंचायत व महात्मा फुले स्मारक समिती खानवडी यांच्या वतीने विविध कार्यक्रम सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: खानवडी ता. पुरंदर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत खानवडी व महात्मा फुले स्मारक समिती खानवडी यांच्या वतीने अभिवादन करून कार्यक्रमाचे आयोजन केले होते, यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली, या कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करत असताना, सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक व महिलासषमीकरणाच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला, सावित्रीबाईंच्या संघर्षमय जीवन कार्याची माहिती विद्यार्थिनींनी प्रभावीपणे मांडत आपल्या उपस्थितांची मने जिंकली, याप्रसंगी महात्मा फुले स्मारक समितीचे अध्यक्ष सुदामराव इंगळे, तहसीलदार विक्रम राजपूत, सहाय्यक गट विकास अधिकारी अविनाश थोरात, गट शिक्षण अधिकारी वैभव डुबल, सरपंच स्वप्नाली होले, दत्ता झुरंगे, माणिकराव झेंडे, दत्ता चव्हाण, रोहिणी कामठे, मंजुषा गायकवाड, तुषार झुरंगे, संदीप टिळेकर, सुनील धिवार आदी उपस्थित होते. तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. प्रा. दिगंबर दुर्गाडे, माऊली यादव, गंगाराम जगदाळे, जालिंदर जगताप, एडवोकेट शिवाजी कोलते त्यांनीही उपस्थित राहून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे यशस्वी असे आयोजन व व्यवस्थापन मुख्याध्यापिका शुभांगी जगताप, राणी पोमण व हेमलता काळे यांनी केले. बाळासो जगताप यांनी सूत्रसंचालन केले, उपसरपंच स्वप्नील होले यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments