Hot Posts

6/recent/ticker-posts

इंडियाना ग्रेटिंग्ज प्रा.लि.कंपनीकडून रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा नायगाव येथे संपन्न सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: जेजुरी एम. आय. डी. सी येथील नामवंत असणारी कंपनी इंडियाना ग्रेटिंग्ज प्रा.लि.च्या सी. एस. आर फंडातून पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील नायगाव,रिसे, पिसे,राजुरी,माळशिरस,मावडी सुपे,पिपंरी,पांडेश्वर या गावांना रुग्णवाहिकेची अत्यंत आवश्यकता होती.तीचा लोकार्पण सोहळा पौर्णिमेचे व सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधत नायगाव(ता.पुरंदर) येथे संपन्न झाला. या भागातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.या भागातील अंदाजे ७० कामगार इंडियाना ग्रेटिंग्ज प्रा.लि.कंपनी मध्ये काम करीत आहेत.इंडियाना ग्रेटिंग्ज प्रा.लि.कंपनी ही पुरंदर तालुक्यातील अनेक शाळांना शौचालय,दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप, बेंच,ट्री गार्ड,पाण्याच्या टाक्या, सोलर दिवे आशी मदत केली आहे.यावेळी रुग्णवाहिका भेट देताना कंपनीचे एच. आर विभागाचे हेड निशाद सलाम,सीनियर एच. आर .मोहन चौंडकर,बाळासो खेसे,कर्मचारी नीलकंठ गाडेकर,किशोर कामथे,हरिचंद्र शेंडकर,प्रकाश कड, सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण चोपडा,विश्वस्त डॉ. दशरथ ठवाळ,अक्षरसृष्टी संस्थेचे अध्यक्ष सिद्धनाथ पवार,पंचक्रोशीतील सरपंच,उपसरपंच,गावातील आजी, माजी पदाधिकारी,भाविक,ग्रामस्थ, महिला,तरुण आदी उपस्थित होते.रुग्णवाहिकेमुळे वेळेत उपचार मिळाले, तर रुग्ण निश्चितपणे बरा होऊ शकतो. त्यासाठी रुग्णवाहिका अत्यंत अत्यावश्यक आहे.अधिकाधिक गरजू रुग्णांना मदत होईल,असा विश्वास कंपनीचे सीनियर एच. आर .मोहन चौंडकर यांनी व्यक्त केला.यासाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट,ग्रामपंचायत, ग्रामस्थ,पंचक्रोशी,माजीसरपंच बारीकराव खेसे,किशोर खळदकर,बाळासो कड, राहुल कड,चंद्रकांत चौंडकरयांनी सहकार्य केल्याचे मोहन चौंडकर यांनी सांगितले.रुग्णवाहिका मिळाल्यामुळे पंचक्रोशी व नायगाव ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.इंडियाना ग्रेटिंग्ज प्रा.लि.कंपनी कडून रुग्णवाहिका मिळाल्यामुळे श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत,पंचक्रोशी व नायगाव ग्रामस्थ यांच्यावतीने कंपनीचे आभार माजी सरपंच बारीकराव खेसे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रदीप खेसे बाळासो कड यांनी केले.

Post a Comment

0 Comments