Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर मधील 29 भूमिहीन कुटुंबांना हक्काची जागा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: ज्याच्याकडे स्वतःचे घर आणि जागाही नाही, अशा कुटुंबांना आधार देण्यासाठी शासनाने 'पंडित दिन दयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे, या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आलेल्या पुरंदर तालुक्यातील 42 प्रस्तावा पैकी 29 पात्र लाभार्थ्यांना, घरकुलासाठी प्रत्येकी अर्धा गुंठा जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, यामध्ये वाल्हे, जवळाअर्जुन, नाझरे सुपे, दौंडज, दिवे, गुलुचे, मावडी कडे पठार आणि पिंपरी खुर्द येथील लाभार्थ्यांचा समावेश आहे, विशेष म्हणजे मावडी कडे पठार येथील 35 वर्षापासून भाड्याच्या घरात राहणाऱ्या वनिता चौंडकर या दिव्यांग महिलेलाही या योजनेतून नुकताच जमिनीचा ताबा मिळाला असून, तहसीलदार विक्रम राजपूत, जेजुरी मंडल अधिकारी संजय बडधे यांच्या हस्ते भूमी पूजन करण्यात आले, योजनेची वैशिष्ट्ये आणि निकष जागा खरेदीसाठी जास्तीत जास्त एक लाख रुपये पर्यंत अर्थसहाय्य मिळते, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल मंजूर असलेल्या पण जागा नसलेल्या, कुटुंबांना याचा लाभ घेता येतो, यासाठी लाभार्थ्यांच्या किंवा रक्ताच्या नातेवाईकांच्या नावे देशात कुठेही जमीन नसावीत, तहसीलदारांचा भूमिहीन दाखला आणि ग्रामसभेचा ठराव, ही कागदपत्रे यासाठी आवश्यक आहेत.

Post a Comment

0 Comments