पुरंदर तालुक्यातील सायकल स्पर्धेच्या स्वागताची पुरंदर मध्ये तयारी प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांची माहिती सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील बापदेव घाट मार्गाने, नारायणपूर, चिवहेवाडी, पानवडी, काळदरीच्या घाटातून आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धकांच्या स्वागतासाठी पुरंदर प्रशासनाने व्यापक अशी पूर्वतयारी सुरू केली असून, या निमित्ताने ग्रामीण भागातील रस्ते विकासाला चालना मिळून ,भविष्यात पर्यटन वाढीस मदत होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली. आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धकांचे बुधवारी दि. 21 रोजी स्टेज दोन भिवरी येथे आगमन तर गुरुवार दि. 22 रोजी स्टेज तीन सासवड येथे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर दि.5 जानेवारी रोजी पुरंदर नवीन प्रशासकीय कार्यालयात वर्षा लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक पार पडली. बैठकीस पुरंदर तालुक्यातील तहसिलदार विक्रम राजपूत, निवासी तहसिलदार संदीप पाटील, सहाय्यक गट विकास अधिकारी महेंद्र गिरमे, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, सासवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक जेजुरी चे दिपक वाकचौरे, सार्वजनिक बांधकाम चे प्रकाश निगडे, गट शिक्षण अधिकारी वैभव डुबल, भाजपचे युवक कार्यकर्ते पानवडीचे समिर भिसे, मंडल अधिकारी, तलाठी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील, ग्रामसेवक, वाघीरे कॉलेज, पुरंदर कॉलेज, म.ए.सो वाघीरे कॉलेज, येथील शिक्षक राष्ट्रीय सेवा योजनेचे एनसीसी, एनएसएस प्रमुख, क्रीडा शिक्षक आधी उपस्थित होते. गाव पातळीवर विशेष अशी खबरदारी प्रत्येक गावासाठी ग्राम महसूल अधिकारी, मंडल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी यांच्या माध्यमातून गावातील राजकीय व सामाजिक पदाधिकाऱ्यांची 50 जणांची यादी तयार करण्यात येणार आहे, त्यामधील प्रत्येक दहा जणांसाठी एका मॉनिटरची नेमणूक करण्यात येणार असून, त्या मॉनिटरला टी-शर्ट टोपी व जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे, स्पर्धेच्या कालावधीत नागरिक व पाळीव जनावरे रस्त्यावर येऊन कोणतीही अनुसूचित घटना घडू नये, याची जबाबदारी ही संबंधित लीडरवर राहणार आहे, यावेळी वर्षा लांडगे म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सायकल स्वार हे स्टेज टू भिवरी, चांबळी, कोडित बुद्रुक, नारायणपूर, चिवहेवाडी, केतकावळे या गावांमधील गावावरून जाणार असून, स्टेज थ्री मध्ये सासवड, सुपे, पानवडी, काळदरी, मांढर, माहूर, परिंचे, हरणी, वाल्हे, पिसुर्डी, निरा या गावातून मार्गक्रमण करणार आहेत, मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती करताना, स्पर्धकांच्या स्वागताची तयारी करण्यात येत आहे, प्रत्येक गावात स्वागत कमाने उभारण्यात येत असून, शाळा व महाविद्यालयातील एनसीसी गटातील विद्यार्थी स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत, तसेच 10 ते 17 जानेवारी दरम्यान स्वच्छता मोहीम राबवून, जनजागृती करण्यात येणार आहे, 7 जानेवारीपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीनुसार पाच पाच गावांच्या संयुक्त बैठका घेण्यात येणार असल्याचेही वर्षा लांडगे यांनी स्पष्ट केले आहे.तसेच त्यामध्ये प्रामुख्याने पोलीस विभागाने पुरेसे प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवावा, आवश्यकतेनुसार वाहतूक वळविणे, व सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेट तयार करणे, सायकल ट्रॅक वरील रस्त्यावर आवश्यक तेथे जाळ्या लावणे इत्यादी उपायोजना कराव्यात, संबंधित प्राधिकरणाने सायकल ट्रॅक मार्गावरील सर्व अनाधिकृत होर्डिंग काढण्यात यावेत, नागरिकांमधून स्पर्धा विना अडथळा पार पाडण्यासाठी, गावातील तरुणांनी, गावकऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी अथवा ज्याला शक्य होईल, अशा लोकांनी आपली सामाजिक बांधिलकी म्हणून, स्वयंसेवक भूमिका पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, नागरिकांनी प्रत्येकाने गावांमध्ये स्वच्छता राखणे, सुशोभीकरण करणे, स्पर्धकांना प्रोत्साहन मिळवण्यासाठी ज्या गावातून अथवा रस्त्याने जाणार आहेत, त्या रस्त्यावर सुशोभीकरण करणे, स्वागत कमानी, पताका, पारंपारिक पद्धतीने गावकऱ्याकडून स्वागत व्हावे, विविध ढोल लेझीम, पारंपारिक खेळ, वेशभूषा, सांस्कृतिक नृत्य याचे आयोजन करावे, स्पर्धेच्या दरम्यान, रस्त्यावर जाणारे लहान मुले, भटक्या कुत्री, इत्यादी येणार नाहीत, यासाठी उपाययोजना कराव्यात सदर स्पर्धा पुण्यातील ग्रामीण जीवनाची, सह्याद्रीच्या डोंगर दर्याची, जगाला ओळख व्हावी, पुण्याच्या आसपासच्या निसर्ग सौंदर्य जगाला जवळून पाहता यावे, म्हणून पुणे परिसरामध्ये पर्यटनाला चालना मिळावी, पुण्याची ओळख जागतिक पातळीवर व्हावी व त्याचा आनंद द्विगुनीत व्हावा, या स्पर्धेतील अनुभव स्पर्धकासाठी आयुष्यभराची आठवण ठरणार आहे, आणि पुणे जिल्ह्यातील लोकांसाठी देखील एक अविस्मरणीय क्षण आहे, त्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभावे, अशा अपेक्षा व्यक्त करून बैठक संपन्न झाली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments