पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेचा वर्धापन दिन 157 वा उत्साहात साजरा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: ऐतिहासिक असा वारसा जपलेल्या, सासवड ता. पुरंदर येथील नगर परिषदेचा 157वा वर्धापन दिन रविवारी( दि. 4) रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. सासवड नगरपरिषदीची स्थापना 4 जानेवारी 1869 रोजी झाली असून ,वर्धापन दिन निमित्त पालिकेची इमारत, तसेच छत्रपती शिवराय, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये आकर्षक विद्युत अशी रोषणाई करण्यात आली होती, नगराध्यक्ष आनंदी( का की) जगताप या स पालिकेच्या अनेक माजी ,आजी सदस्य आणि नागरिकांनी भेट दिली, सासवडकर नागरिकांच्या सहकार्याने पालिका मूलभूत सेवा सुविधा, पुरवण्यास शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण व इतर उपक्रमातही अग्रेसर राहिली असून, लोकसहभागाच्या जोरा वर भविष्यातही यश कायम राखण्याचा निर्धार नगराध्यक्षा आनंदी (काकी) जगताप यांनी व्यक्त केला. यावेळी या दिवसभरामध्ये आमदार विजय शिवतारे, गटनेते अजित जगताप, विरोधी घटनेते मंदार गिरमे, नगरसेवक मनोहर जगताप, लिना वढणे, बाळासो भिंताडे, ज्ञानेश्वर जगताप, शितल भोंडे, स्मिता सुहास जगताप, सोपान रणपिसे, रत्ना म्हेत्रे, राजन जगताप, अर्चना जगताप स्मिता उमेश जगताप, वैभव टकले, प्रितम म्हेत्रे, दिपाली जगताप, प्रियंका जगताप, प्रदीप राऊत, ज्ञानेश्वर गिरमे, यासह मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, पत्रकार,नगरपरिषद कमॅचारी वगॅ,अधिकारी, सासवड कर नागरीक आदी उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments