पुरंदर तालुक्यातून स्टेज टू साठी आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी प्रत्येक गावामध्ये स्वच्छता सुशोभीकरण करुन स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावे: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: बुधवार दि. 21जानेवारी 2026 रोजी जागतिक पहिली आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा आयोजित केली आहे, सदर सायकल स्पर्धा पुरंदर तालुक्यामध्ये स्टेज टू मध्ये चांबळी, कोडीत बुद्रुक, नारायणपूर येथे पर्यंत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अधिकाऱ्यासोबत सायकल स्पर्धेचे पूर्व तयारी पाहणी केली, नारायणपूर येथील गुरुवर्य अण्णा महाराज या ठिकाणच्या सभागृहामध्ये जिल्हाधिकारी यांनी स्टेज टू मधील गावातील नागरिकांशी, सभागृहामध्ये आढावा बैठकीत बोलताना म्हणाले की, पोलीस विभागाने पुरेशा प्रमाणामध्ये बंदोबस्त ठेवावा, आवश्यकतेनुसार वाहतूक वेळीच वळवणे, सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेट करावे, सायकल ट्रॅक साठी रस्त्यावर आवश्यक तेथे जाळ्या लावाव्यात, संबंधित प्राधिकरणाने सायकल ट्रॅक वरील सर्व अनाधिकृत होर्डिंग काढावेत, ही स्पर्धा पार पाडण्यासाठी गावातील तरुणांनी, गावकऱ्यांनी, विद्यार्थ्यांनी शक्य होईल, त्यांनी स्वयंसेवक म्हणून भूमिका पार पाडावी, सहकार्य करावे, त्यासाठी प्रथम गावामध्ये स्वच्छता राखणे, सुशोभीकरण करणे ,स्पर्धकांना प्रोत्साहन मिळवण्यासाठी रस्त्याने जाताना, रस्त्यावर सुशोभीकरण करावे, स्वागत कमानी आणि पताका, पारंपारिक पद्धतीने गावकऱ्याकडून स्वागत व्हावे, विविध ढोल, लेझीम, पारंपारिक खेळ, वेशभूषा, सांस्कृतिक नृत्य असे याचे आयोजन करावे, स्पर्धेच्या दरम्यान, रस्त्यावर जनावरे, लहान मुले, भटकी कुत्री इत्यादी येणार नाहीत, याची योग्य वेळी खबरदारी घ्यावी,सदर ही स्पर्धा पुण्यातील ग्रामीण जीवनाची, सह्याद्रीच्या डोंगर दर्याची ओळख व्हावी, पुण्याचे निसर्ग सौंदर्य जगाला जवळून पाहता यावे, यासाठी 40 देशांची जनता ही लाईव्ह बघणार आहेत, त्यासाठी पुरंदर मधील असणारी अस्वच्छता ही आत्ताच काढून टाकायची आहे, त्यासाठी ग्रामपंचायतचा सहभाग हा महत्त्वाचा आहे, पुणे परिसरात पर्यटनाला चालना मिळावी, पुण्याची ओळख जागतिक स्तरावर ठरणार आहे, त्याचा आनंद हा द्विगुणित व्हावा, या स्पर्धेतील अनुभव स्पर्धकासाठी आयुष्यभराची आठवण ठरणार आहे, ही टूर 100 ते 150 वर्ष रेस चाललेली पाहिजे, असे कृत्य थोडक्यात पुणे जिल्ह्याने इतिहास घडवून दाखवायचा आहे, पुणे जिल्ह्यातील लोकांसाठी देखील एक अविस्मरणीय क्षण असा असणारा आहे, तसेच आज पत्रकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी यांनी पुरंदर मधील पत्रकारांचे सुद्धा अभिनंदन केले, यावेळी जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी, वर्षा लांडगे उपविभागीय अधिकारी( प्रांत)पुरंदर, विक्रम राजपूत तहसीलदार पुरंदर, प्रणोती श्रीश्रीमाळ गटविकास अधिकारी, भरतकुमार बाविस्कर अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम पुणे, अनुराधा भंडारी कार्यकारी अभियंता दक्षिण विभाग, गणेश बिराजदार अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, राजेंद्र सिंह गौर उपविभागीय पोलीस अधिकारी पुरंदर -भोर, पोपट टेंबे स्वामी महाराज नारायणपूर देवस्थान, भरत (नाना) शिरसागर नारायणपूर देवस्थान, संदीप पाटील निवासी तहसीलदार पुरंदर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम सासवड पोलीस स्टेशन, डॉ. कैलास चव्हाण मुख्याधिकारी सासवड नगरपरिषद, श्रीधर चव्हाण कृषी अधिकारी पुरंदर, प्रकाश निगडे अभियंता सार्वजनिक बांधकाम पुरंदर, प्रदीप बोरकर सरपंच नारायणपूर, दादासो भंवर ग्रामसेवक नारायणपूर,समिर भिसे भाजप युवक कार्यकर्ता, मंडल अधिकारी ,तलाठी, पंचक्रोशीतील स्टेज टू मधील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सामान्य नागरिक, कृषी सहाय्यक कमॅचारी, शाळेचे विद्यार्थी ,शिक्षक, आशा वर्कर, पत्रकार, पोलीस पाटील, तर प्रामुख्याने नारायणपूर येथील ग्रामपंचायत, देवस्थान कमिटीने आजच्या जिल्हाधिकारी दौऱ्याच्या बैठकीचे नियोजन केले होते, प्रास्ताविक राजेंद्र चौगुले मुख्याध्यापक नारायणपूर यांनी केले, तर पुढील पाहणी दौरा नारायणपूर मधून जिल्हाधिकारी यांनी रोडवरील चिवहेवाडी, देवडी, केतकावळे असा पाहणी दौरा स्टेज टू चा आज केला.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments