पीडित युवक सौरभ वाघच्या पुरवणी जबाब आणखी आरोपींची नावे ; तर वीरच्या महिला सरपंच पतीसह नातेवाईकांवर मारहाण व धिडप्रकरणी गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: (वीर ता. पुरंदर) येथील सौरभ वाघ यास मारहाण आणि धिड काढल्याप्रकरणी सासवड पोलिसांनी सुरुवातीस काही आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता, मात्र नुकत्याच नोंदविलेल्या पुरवणी जबाबदात आणखी काही आरोपींची नावे पुढे आली आहेत. यामध्ये वीर ग्रामपंचायतीच्या विद्यमान महिला सरपंच यांची पती आणि श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष त्यांचे चुलत बंधू आणि अन्य व्यक्तींचा समावेश असून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरव वाघ यांच्या फिर्यादीनुसार एका स्थानिक हॉटेलमधील बिलावरून वाद निर्माण होऊन, त्याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याची इंदिरानगर पासून व ऊमाजी नाईक चौकापर्यंत धिड काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सुरुवातीला दबावामुळे काही निवडक व्यक्तींचीच नावे दिल्याचे वाघ यांनी स्पष्ट केले असून, सीसीटीव्ही फुटेज व सामाजिक आधार मिळाल्यानंतर त्याने, सासवड पोलीस ठाण्यात पुरवणी जबाब नोंदवला. या नव्या जबाबाच्या आधारे सासवड पोलिसांनी वीर ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच मंजुषा धुमाळ यांचे पती आणि श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष संतोष धुमाळ त्यांचे चुलत भाऊ ऋषिकेश बाळासो धुमाळ, अजित विठ्ठल चव्हाण, रुपेश रतन धुमाळ, गणेश बाबुराव धुमाळ, मंगेश महादेव धुमाळ, गणेश विद्याधर धुमाळ, रोहन संजय धुमाळ, योगेश चंद्रकांत धुमाळ आणि अन्य दहा व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याप्रकरणी ऍडव्होकेट मंगेश ससाने यांनी पीडित वाघची भेट घेतली, एडवोकेट ससाने यांनी सांगितले की, या गंभीर प्रकरणात भारतीय दंडविधानातील कलम 196 सारख्या कठोर कलमांचा समावेश होणे गरजेचे आहे, आरोपींना नोटीस देऊन त्यांना मोकाट ठेवले जात आहे, अशामुळे पीडित युवकावर तडजोडीसाठी दबाव टाकला जात आहे, आम्ही या संदर्भात गृहमंत्रालयाकडे निवेदन देणार आहोत, पीडित युवक स्पष्ट केले की, सुरुवातीला प्रचंड मानसिक दबाव होता, त्यामुळे मी मोजक्या आरोपींचीच नावे दिली मात्र सीसीटीव्ही फुटेज व समाजातून मिळालेल्या आधारानंतर मी उर्वरित आरोपींची नावे पुरवणी जबाब दिली आहेत. माझ्यावर तडजोडीसाठी अनेक माध्यमातुन दबाव येत असून, मला न्याय मिळावा अशी मी अपेक्षा करतो, या प्रकरणाचा तपास सासवड पोलीस करीत असून, कायदेशीर प्रक्रियेनुसार पुढील कारवाई होईल अशी माहिती सासवड पोलीस स्टेशन कडून देण्यात आली आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
YouTube channel
Most Popular
FM RADIO 📻
FM Code
FM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा
0 Comments