१३ऑगस्ट ला सासवडला आचार्य मराठी साहित्य संमेलन. सासवड प्रतिनिधी: साहित्यसम्राट प्रल्हाद केशव उर्फ आचार्य अत्रे यांचे नावाने त्यांच्या १२७ व्या जन्मदिनी २८ वे साहित्य संमेलन होणार आहे. सासवड नगरपालिकेच्या आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनामध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाचे ज्येष्ठ विनोदी लेखक सु.ल.खुटवड अध्यक्ष आहेत. संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रसिद्ध डॉ. विनायक म्हाळसाकांत खाडे यांची निवड केल्याची माहिती आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते व सासवड शाखेच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष ॲड. दिलीप निरगुडे यांनी दिली. साहित्य संमेलनामध्ये उद्घाटन नंतर "भारतीय राज्यघटना" व "आचार्य अत्रे साहित्य मीमांसा" या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले आहे. याशिवाय बाल आनंद मेळावा आणि निमंत्रित कवींचे कवी संमेलन होणार आहे. संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे उपस्थित राहणार आहेत. तर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न.म. जोशी यांच्या भाषणाने समारोप होणार आहे. साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सचिव शांताराम पोमण यांनी केले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments