पोथी वाचणारे बाबा अखेर सापडले पण गावठाणात येण्यास नकार सासवड प्रतिनिधी: पोथी वाचणारे बाबा पोथीसह गावापासून दूर वनात सापडले आहेत.त्यांना कोडीत नाक्यावरील त्यांच्यासाठी बांधलेल्या ओट्यावर येण्याचा आग्रह केला परंतु ते जागचे हलले नाहीत . गावात यायला नकार दिला आहे. कारण विचारले असता त्यांनी खालील कारणे सांगितली आहेत. मी ज्या ठिकाणी बसतो तेथे स्वच्छता नसते. झाडणारे लोक व्यवस्थित झाडत नाहीत आणि झाडले की नाही? हे बघायला अधिकारी पंख्याखालून रस्त्यावर येत नाहीत.स्वच्छता ठेकेदार मालामाल झाले आहेत .पण नागरिकांच्या पदरी निराशा वाट्याला आली आहे .मी बसतो त्या ठिकाणच्या दगडी बाजूला करावीत हे सुद्धा कोणाला वाटत नाही.सकाळी उठून अंघोळ करावी तर ४दिवसातून पाणी येते.प्यायला पाणी नाही. पण रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी रोज वाहत असते.सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते .कधीकधी नळालाच ड्रेनेजचे पाणी येते. भल्या पहाटे नदीत अंघोळीला जावे म्हणतो. पण नदीत ड्रेनेजचे पाणी वाहत असते.गावापासून लांब अंघोळीला जावे तर कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांनी खड्ड्यांचे रस्ते की खड्ड्यात रस्ते बनवले आहेत ते समजत नाही. रस्त्यांवर काही ठिकाणी स्ट्रीट लाईट नाहीत.काही बंद अवस्थेत आहेत.रस्त्यांवर अतिक्रमण आहे. टपऱ्या ,हातगाड्या,भाजी बाजार,वाहतूक कोंडी. रस्त्यांची नियमित रेषा आखली नाही.नदीची पूर रेषा आखली नाही. त्यामुळे नदी कोणती? ओढा कोणता ?कळत नाही .इमारती नदीत आहेत का नदी इमारतींमध्ये ते समजत नाही. सुमारे १० ते१२ एकदा तर पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या "जगताप आळी" येथील पाइपलाइन मध्ये दारूची बाटली सापडली. एका अधिकाऱ्याने तर वीर वरून येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनलाच अनधिकृत "टी" मारून अशुद्ध पाणी ताथेवाडीत पिण्यासाठी नेले. मी पाणी पुरवठा केंद्रावर काम करणाऱ्या ठेक्यातील कर्मचाऱ्यांवर व अधिकाऱ्यांवर नाराज आहे . आग लागली तर अग्निशामक गाडी उशिरा पोहोचते .तर कधी बिन पाण्याची!धोकादायक इमारतीना नोटीस दिली जात नाही. काही लोकांना दफन करण्यासाठी जागा नाही, तर दहन करणारी जागा व्यवस्थित नाही.सिद्धेश्वर येथील पाणी पुरवठा करणाऱ्या नगरपालिकेच्या इमारतींचा व जागेचा वापर उद्यान ,पर्यटन,अथवा इतर योग्य गोष्टीसाठी करता आला असता पण नगरपालिकेची मालमत्तेचे नुकसान झाले तरी चालेल पण त्यांचा वापर करायचा नाही हे नगरपालिकेचे ब्रीद! (उदा. कब्रस्तान झोपडपट्टीतील बालवाडी,बोरावके मळा शाळा, खेनट मळा शाळा इत्यादी. )अशी मानसिकता. साथीचे आजार दरवर्षी ठरलेलेच . डास,वाढलेले गवत ,भटकी कुत्री, याकडे दुर्लक्ष करायचेच. कत्तलखाने,दुग्धजन्य पदार्थ, मिठाई,हॉटेल मधील पदार्थ,हातगाड्यांवरील खाण्याचे पदार्थ, शुद्ध पिण्याचे पाणी पुरवणारे प्लांट यावरील नियंत्रण कोणाचेच उरले नाही. नगरपालिकेचे उत्पन्न वाढावे यासाठी नगरपालिकेचे सर्व गाळे भाड्याने जावेत, भाडेवाढ करावी, पुन्हा जुन्या गाळ्यांचे लिलाव करावेत हे न करता सुधारित करामुळे नागरिकांचे हाल होणार आहेत.वृक्ष अधिकाऱ्याने झाडे लावण्याच्या ऐवजी खूप झाडांची कत्तल केली .ऑडिट मध्ये अनेक वेळेस काही पैशांचा हिशोबच लागला नाही एक प्रकरण गुपचुप मिटवण्यात आले .ढीगभर लेखापरीक्षणातील आक्षेप प्रलंबित आहेत. नगरपालिका शाळांचे शिक्षण आणि सोई सुविधा याबाबत बोलणारच नाही. ७ इयत्तेतील मुलांना "इंग्लिश "चे स्पेलिंगच आले नाही.नागरिकांना नगरपालिकेने दिलेल्या नोटीसचे काहीच वाटत नाही. कारण फक्त नोटीस दिली जाते कारवाई केली जात नाही.सासवडच्या उद्यानामध्ये जायचे नसते ते लांबून बघायचे असते उद्याने ही ठेकेदाराच्या कमाईसाठी ठेवली आहेत नागरिकांसाठी नाही.ती दारू गांजा प्यायची जागा आहे."मागील वेळेस मी गावातून निघून गेलो होतो. माझी पोलिस स्टेशन मध्ये कोणीही हरवल्याची तक्रार दिली नाही.माझी गरज गावाला नाही. त्यामुळे मी येणार नाही. साऱ्या प्रकारांनी मी उद्विग्न झालो आहे"बाबांना उपाय विचारला असता, "मुख्याधिकारी सासवड यांनी एखाद्यातरी दोषी अधिकाऱ्यांवर अथवा कर्मचाऱ्यावर कारवाई, ठपका देणे,नियतवेतनावर अथवा समयश्रेणीवर पदोन्नती अथवा समयश्रेणीत खालच्या पातळीवर आणणे,वेतनवाढ रोखणे अथवा पदोन्नती रोखणे,झालेली हानी वेतनातून वसूल करणे, द्रव्यदंड ,निलंबन ,सेवेतून दूर करणे, बडतर्फ करणे अशा प्रकारची कारवाई जो पर्यंत करीत नाहीत तो पर्यंत मी येणार नाही ."असे बाबांनी सांगितले आहे. अशी माहिती डॉ. उदयकुमार जगताप यांनी प्रतिनिधीला माहिती दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments