"उत्कर्ष हवा असल्यास संघर्ष करावा लागतो"- निवेदिता शिंदे गरजवंत, होतकरु विद्यार्थ्यांना सेवा सहयोग संस्थेच्यावतीने मदतीचा हात. सासवड प्रतिनिधी: सेवा सहयोग फाउंडेशन, नवी पेठ, पुणे यांच्यामार्फत श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड संचलित श्री केदारेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, काळदरी येथील गरीब व होतकरु अशा ९१ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट वाटप करण्यात आले. सासवड येथील स्व एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान, पुरंदर यांच्या प्रयत्नांतून आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय चिकणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व चंदुकाका जगताप आणि विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या व्रुथ इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस इंडिया प्रा.ली, पुणे या कंपनीचे सहाय्यक समन्वयक निवेदिता शिंदे यांनी "उत्कर्ष हवा असल्यास संघर्ष करावा लागतो" या संदेशासहित विद्यार्थ्यांना अभ्यास मेहनत व सातत्य यांचे महत्त्व पटवून दिले. काळदरी येथील विद्यालयातील ९१ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रत्येक दप्तरांमध्ये वह्या, कंपास बॉक्स, चित्रकला वही, रंगपेटी आदी साहित्यांचा समावेश आहे. सेवा सहयोग ही संस्था पुणे जिल्ह्यातील विविध शाळांना मदत करीत आहे. हे कार्य सतत १४ ते १५ वर्षे अखंडरित्या सुरू आहे. खेड्यात काही गरीब मुलांना दप्तरेही मिळत नाही. त्यांच्यामध्ये कोणताही न्यूनगंड राहू नये, यासाठी संस्थेच्यावतीने शालेय साहित्याचे वितरण केले जाते. या उपक्रमासाठी पुणे येथील व्रुथ इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि. पुणे या कंपनीच्या सहकार्याने सेवा सहयोग फाउंडेशन, नवी पेठ, पुणे यांच्या माध्यमातून सासवड येथील स्व एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान पुरंदर यांचे संस्थापक अध्यक्ष संतोष जगताप यांनी पाठपुरावा केला. सेवा सहयोग फाउंडेशन, पुणे या संस्थेच्या समन्वयक अंकिता जोशी यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत त्यांच्या "उज्वल भविष्यासाठी" शुभेच्छा दिल्या. यावेळी शालेय साहित्याचे वाटप निवेदिता शिंदे, अंकिता जोशी, सारंग देशपांडे,सुमित दिवाकर, श्रेयस शिंदे, स्वप्निल भांड, जुलिया विल्नर, मृणाल पोफळे, रेवती कुलकर्णी, शिवांगी शुक्ला व स्वाती भोपळे यांच्या हस्ते करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणात आवश्यक त्या साधनांची मदत मिळावी आणि त्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ व्हावा या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला. ९१ विद्यार्थ्यांना हा उपक्रम प्रेरणादायी ठरला असून सेवा सहयोग फाउंडेशनचे सामाजिक भान आणि बांधिलकी यांचे उत्तम उदाहरण आहे. हा समारंभ विद्यार्थ्यांमध्ये नवी ऊर्जा व सकारात्मकता निर्माण करणारा ठरला असून सर्व उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे पर्यवेक्षक पांडुरंग दुर्गाडे, सुनिल घोडके, शिवाजी गोडसे, संजय भिंताडे, पंडित चेंडके, सुनंदा टकले व कविता शेलार यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरंदर तालुका उच्च माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मा संतोष नवले यांनी केले तर बाळू पोमण यांनी आभार मानले.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments