Hot Posts

6/recent/ticker-posts

कृषी विभागाच्या वतीने हरगुडे येथील शेतकऱ्यांसाठी भुईमूग पीक प्रशिक्षण शिबिर सासवड प्रतिनिधी: राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान अंतर्गत परिंचे कृषी विभागाच्या वतीने वाटप केलेल्या हरगुडे या गावच्या सुवर्णयुग शेतकरी बचत गटाच्या सर्वशेतकऱ्यांना या पिकाबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गावातील श्री जानाई देवीच्या मंदिरात आज दिनांक ६ ऑगस्ट रोजी या एक दिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या विभागातील मंडल कृषी अधिकारी अनिल धुरगुडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना भुईमूग तसेच कांदा व सोयाबीनया पिकाविषयी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांच्या अनेक शंकांना यावेळी उत्तरे देण्यात आली. याच कार्यक्रमात माती परीक्षण बाबत महत्वाची माहिती देण्यात आली खरीप हंगाम २०२५ अंतर्गत महाराष्ट्र डीबिटी शेतकरीयोजनेंतर्गत परिंचे मंडल कडून जुन महिन्यात गळीत धान्य प्रकल्प व प्रमाणित बियाणे कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना भुईमूग बियाणे वाटप करण्यात आले होते. उप कृषी अधिकारी संदीप कदम, कृषी सेवक धनश्री रोटे यांसह हरगुडे गावचे अनेक शेतकरी बांधव या वेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments