पुरंदर तालुक्यातील सासवडचे सेंटर विस्तारा अभीवि जेजुरी येथे स्थलांतरित सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ग्रामीण रुग्णालयामध्ये सध्या केवळ 30 बेडची सोय आहे ज्यामुळे आयसीयू सुविधा देता येत नाही, रुग्णांची वाढती संख्या पाहता बेडची संख्या 50 करण्याची मागणी सामान्य नागरिकांमधून होत आहे, त्याच्या काही जागा नसल्याने, मर्यादा येत, आत जागे अभावी येथील महत्त्वाचे ट्रामा सेंटर हे जेजुरी येथे स्थलांतरित करण्यात आलेले आहे. या जागेची उपलब्धता झाल्यास केवळ बेडची संख्या वाढवून, आयसीओ सारख्या चांगल्या सुविधा देता येतील आता 50 आणि भविष्यात 100 बेडच्या रुग्णालयाची आवश्यकता भासणार आहे, यासाठी पाच एकर जमिनीचे मागणी आहे, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन अकमार यांनी सांगितले. सासवड ग्रामीण रुग्णालय यामध्ये रुग्णसेवेत अत्यंत दक्ष असलेले डॉक्टर, वेळेवर उपस्थित असले तरी, रुग्ण उपचारावर समाधानी असले, तरी जागेची तीव्र अभाव या रुग्णालयाच्या विस्ताराला मोठा अडथळा ठरत आहेत. दररोज 400 ते 500 बाह्य रुग्णाची तपासणी होत असलेल्या, आणि एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या भार पेलणाऱ्या या रुग्णालयाचे रूपांतर आता उपजिल्हा रुग्णालयात होईल ,मात्र आजी-माजी आमदार कडे जागेच्या प्रश्नावर पाठपुरावा करत असले, तरी ठोस असा निर्णय कुठलाही झालेला नाही, 2018 पासून वाढीव जागेसाठी पाठपुरावा सुरू आहे मात्र सदस्य नसल्याने, आम्हाला निर्णय घेता येत नाहीत असेही सांगण्यात येते असे, डॉ.अकमार म्हणाले. खांदेदुखी साठी हडपसर ,पुणे, फलटण अशा विविध डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करायला सांगितले असताना, पण सासवडच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी गोळ्या औषधे देऊन, मला चांगला आराम मिळालेला आहे. कोमल कामठे, कुंभार वळण पुरंदर तालुका. रुग्णालयामध्ये श्वान वंशाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे, त्याबाबतच्या लसीची उपलब्धता ही मूबलक आहे मात्र, या घटनेवर मर्यादा आणण्यासाठी श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी सासवड नगरपरिषद आणि ग्रामीण प्रशासनाला कळविले आहे. मात्र याबाबत कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. डॉ. गजानन अक मार, वैद्यकीय अधीक्षक सासवड ग्रामीण रुग्णालय.
कृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘'"Purandar Prime News""’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: """Purandar Prime News"""/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
0 Comments