पुरंदर तालुक्यातील सासवड शहरांमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ एका रात्रीमध्ये पाच ते सहा दुकाने फोडली ;तर तीन लाख छत्तीस हजाराची चोरी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथील शहरामध्ये सोमवारी दि. 3 पहाटेच्या सुमारास साधारण तीन वाजून 30 मिनिटांनी एस.टी बस स्थानका जवळच्या सोपानगर रस्ता आणि दिनकर कॉम्प्लेक्स मधील पाच ते सहा दुकानांचे शटर उचकटून रोख रक्कम आणि ऐवज असा तीन लाख छत्तीस हजार पाचशे रुपयाची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली, चोरट्यांनी शहरातील ओंकार निगडे यांचे शूज, अरुण मगर यांची बेकरी, मंगेश काकडे यांची मोबाईल शॉपी, किरण जगताप यांचे फॅशन दुकान, महेश भिताडे यांची मोबाईल शॉपी व एक दुकानदाराचे शटर उचकटले असून या दुकानांना लक्ष केले असता, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निगडे यांच्या शूज दुकानात चोरट्यांनी सोमवारी पहाटे तीन वाजून 30 मिनिटांनी सुमारास यामध्ये फोडले, त्यांनी विविध कंपन्याची सुमारे एक लाख वीस हजाराचे शूज चोरी केल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे, चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले आहेत, चोरी वेळी दोघे बाहेर थांबले ची माहिती आहे, सर्व चोरट्याने आपल्या तोंडाला रुमाला बांधलेले असून, प्रवेश आत केलेला दिसून येत आहे, त्यानंतर चोरट्यांनी अरुण मगर यांच्या बेकरीतून एक लाख 32,000 ची रोख रक्कम चोरली असून, मंगेश काकडे यांच्या मोबाईल शॉपीतून ३२,५०० रुपयाची चोरी केलेली आहे. त्यानंतर किरण जगताप यांच्या फॅशन दुकानातून 12 हजाराचा मोबाईल चोरी गेलेला आहे, महेश भिंताडे यांच्या मोबाईल शॉपीतून 40 हजाराची मोबाईल चोरट्यांनी गेलेले आहेत या सर्व घटनांच्या सकाळी सात वाजता या उघडकीस आल्या असता, त्यानुसार या सर्व चोरीच्या घटना सकाळी उघडकीस आल्यामुळे, प्रथम सासवड पोलीस पथकाने त्या ठिकाणी पाहणी करून, त्या ठिकाणचा पंचनामा करून घेताना पोलिसांनी ओंकार निगडे यांचा फोन आला असता, त्वरित त्या ठिकाणी पहाणी केली त्यावेळी पत्रकार व पोलीस सुद्धा सासवड पोलीस स्टेशनचे प्रत्यक्ष दर्शनी फोन आल्यामुळे हजर होते, त्यानुसार नंतर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंग गौर, पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी घटनास्थळी पाहणी केली असता, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे व त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी पंचनामा केलेला आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments