Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील चांबळी येथील रस्त्याची अवस्था बिकट झाली सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: चांबळी ता. पुरंदर येथील पाणंद नंबर दोन रस्त्याची अवस्था बिकट झालेली आहे, हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा होणे गरजेचे असून, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या रस्त्यावर जाताना मोठी कसरत करावी लागत असते, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पत्र व्यवहार करण्यात आलेला असून, आमदार विजय शिवतारे यांनी या रस्त्यासाठी 15 लाख रुपये निधी जाहीर केला आहे, या अगोदर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रमोद काकडे यांच्या माध्यमातून दहा लाख रुपयांचा निधी खडी करण्यासाठी जाहीर केला होता, मात्र त्या नंतर कसलाच निधी या पाणंद रस्त्यासाठी न मिळाल्यामुळे, आज रस्त्याची मोठी दुरावस्था झालेली आहे, या चिल्लाळे वस्ती, कणसे वस्ती, ताकदरा, गणेश नगर येथील लोक रोज या रस्त्याने येजा करीत असतात, या रस्ता सिमेंट काँक्रेटचा होणे गरजेचा असून, त्यामुळे या रस्त्यावर तातडीने आणखी निधी मिळावा या मागणीसाठी निरा बाजार समितीचे संचालक वामन कामठे, माजी उपसरपंच संजय कामठे, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मारुती कामठे, माजी उपसरपंच पोपट शेड कर ,उद्योजक शहाजी कामठे, माजी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भाऊसो कामठे यांनी यासाठी पाठपुरावा केला आहे.अशी माहिती माजी उपसरपंच संजय कामठे यांनी प्रतिनिधी ला माहिती दिली.

Post a Comment

0 Comments