पुरंदर तालुक्यातील सासवड मधील अवैध धंद्याकडे प्रशासनाचे पुणॅपणे दुर्लक्ष सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर शहरात गुन्हेगारी अवैध धंदे वाढत आहेत, मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असून, सासवडमधील या समस्यावर प्रशासन लक्ष देणार कधी? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलेला आहे, सासवड मधील प्रशासकीय कारभाराची ची गंभीर व्यथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. उदयकुमार जगताप यांनी समाज माध्यमातून मांडलेली आहे, उपविभागीय पोलीस कार्यालयासमोरील खंडोबा नगर, झोपडपट्टीतील रहिवाशाकडून नुकताच एका कंत्राट दारावर हल्ला झाल्याने, घटनेने डॉ. जगताप यांनी 12 ते 13 वर्षांपूर्वी पालिकेला पत्राद्वारे झोपडपट्टी बद्दल व्यक्त केलेली भीती खरी ठरत असल्याचे, त्यांनी म्हटलेले आहे. अनेक वर्षापासून ही झोपडपट्टी गांजा, गावठी दारू आणि जुगार, चक्री यासारख्या अवैध धंद्याचे केंद्र बनलेले आहे. वर्ष 2012 पासून वारंवार तक्रारी करूनही, गृह खात्याने केवळ तात्पुरत्या कारवाईच्या पलीकडे काही केलेले नाही, यामुळे गुन्हेगारांना कायद्याची भीती उरलेली नाही अशी डॉ. जगताप यांचे मत आहे. सासवडच्या विकास आराखड्यात सर्वे नंबर 620 मधील 96 गुंठे जागा नगरपालिकेने शॉपिंग सेंटर साठी आरक्षित ठेवलेली असून, पण याच जागेवर झोपडपट्टी वसलेली आहे, सार्वजनिक बांधकाम खात्याने येथे रस्त्यासाठी सुधारणा निधी मंजूर केलेला असून अजून सबंधित अधिकाऱ्यांनी आरक्षणाची माहिती न घेता निधी खर्च करणे, ही मोठी शोकांतिका असल्याचे डॉ. जगताप म्हणाले आहेत. झोपडपट्टी वाशी यांनी संरक्षक भिंत पाडून, पूर्वेकडील एका बाजूचा रस्ता बंद केलेला आहे. असे ते म्हणाले आहेत, डॉ. जगताप यांनी शहरातील शेतकऱ्यांची दुर्दशा देखील मांडलेली आहे, विकास आराखड्यामध्ये 60% भूभाग शेती झोन असतानाही, पाणीपुरवठा योजना करण्याचे नगरसेवकांना कळले नाही, सासवड शहरी भागात मोडत असल्याने, येथील शेतकऱ्याला कृषी खात्याचा कोणत्याही योजनांचा फायदा मिळत नाही, नगरपालिकेचा वाढता कर, महागाई आणि शेतमालाचा अस्थिर बाजारभाव यामुळे तरुण वर्ग शेती विकू लागलेला आहे.सासवडकर यांच्या प्राथमिक गरजा डॉ. जगताप यांनी सासवड करांना कोट्यावधीचे मोठे प्रकल्प नको, तर पिण्याचे पाणी शेतीला, वीज, पाणी, सुरक्षितता, दर्जेदार रस्ते आणि शांतता यासारख्या मूलभूत सुविधांची गरज असल्याचे, सांगत सासवडकर नागरिकांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अड्ड्यांचे थांबवण्यासाठी ग्रामसभा घेऊन आपल्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची वेळ आली आहे, असे आव्हानही त्यांनी केलेले आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments