पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणच्या कंत्राटदाराला काम रोखण्यासाठी मारहाण करण्यात आली सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथील खंडोबा नगर झोपडपट्टी परिसरामध्ये काँक्रीटकरण्याचे काम सुरू असताना, येथे 'काम करू नका' असे म्हणताना सरकारी कंत्राटदाराला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दि. 31 रोजी सायंकाळी घडली. या घटनेमध्ये कंत्राटदाराला रस्ताचे काम चालू असताना जी मारहाण झाली असून सासवड पोलीस ठाण्यामध्ये अनिल प्रमोद सोळंकी आणि रोशन प्रकाश वाघमारे या दोन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत कंत्राटदार तेजराज जालिंदर काकडे रा. केशवनगर सासवड यांनी सासवड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार ते 27 ऑक्टोबर पासून खंडोबा नगर झोपडपट्टी येथे अंतर्गत बोळीच्या काँक्रिटीकरणाचे काम करत होते, 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी दुर्गादेवी मंदिरा शेजारील बोलीत काम चालू असताना अनिल प्रमोद सोळंकी नावाचा मुलगा तेथे आला त्याने काकडे यांना येथून हला येथे 'काम करू नका' असे म्हणून दमदाटी व शिवीगाळ केली, यानंतर झालेल्या झटापटीमध्ये अनिल सोळंकी याने त्यांना हडको खंडोबा नगर रस्त्यावर आणले तेथेही बाचाबाची सुरू असताना, अनिल सोळंकी यांनी दगड उचलून काकडे यांच्या डाव्या हातावर मारला, त्याच वेळी रोशन प्रकाश वाघमारे हा सोळंकी यांचा जोडीदार तेथे आला त्याने शिवीगाळ करत तेथे पडलेला लाकडी रंदा उचलून काकडे यांच्या उजव्या कानाच्या वर डोक्यात मारला, त्यामुळे काकडे यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला असून, ते खाली पडले. त्यांच्यावर सासवड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, या झटापटीमध्ये काकडे यांच्या हातातील घड्याळ देखील गहाळ झाले आहे. आरोपींनी काकडे यांच्या सहकार्यालाही शिवीगाळ व दमदाटी केली याबाबत पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments