Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड कोडित रस्त्याची दुरावस्था तर पुरंदर मधील सार्वजनिक बांधकामचे अधिकारी यांचे दुर्लक्ष सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड पासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सासवड कोडित रस्त्याची दुरावस्था झालेली असून, पुरंदर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी हे पूर्णपणे दुर्लक्षित असून, मुळातच या ठिकाणी अरुंद असलेल्या सासवड कोडित रस्त्याच्या साईड पट्ट्याचे पाट झालेले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसून येतच नाहीत, तर मात्र या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने ,मोठी गाडी आल्यास दुचाकी वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे, त्यामुळे छोटे-मोठे अपघातही या ठिकाणी होत आहेत, कोडीत येथे श्रीनाथ म्हस्कोबा महाराज यांचे मंदिर आहे, हजारो भाविक भक्त रविवारी पौर्णिमा आणि अमावस्येला या दिवशी श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरातील महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात, या सर्व भाविकांना नहाकतेचा त्रास या रस्त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे, सासवड कोडीत रस्त्यावरून गराडे, थापेवाडी, दरेवाडी, वारवडी सोमर्डी व खेड- शिवापुर असा मार्ग असताना, देखील सासवड ते कोडीत रस्त्याची अवस्था रस्त्यामध्ये खड्डेच खड्डे? तर खड्ड्यात रस्ता? अशी झालेली आहे, साईड पट्ट्याचे पाट झालेले आहेत, अलीकडच्या काळात माजीमंत्री व पुरंदर हवेली चे आमदार विजय शिवतारे यांना मताधिक्य देणारे गाव म्हणून कोडितची ओळख आहे, त्यामुळे त्यांचे या रस्त्याकडे विशेष लक्ष असणे आवश्यक आहे, परंतु तसे त्या ठिकाणी दिसत नाही, सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींचे पडघम वाजू लागलेले आहेत, गराडे पंचायत समिती गणातून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी डझनभर इच्छुक आणि उभे राहण्याची तयारी केलेली आहे. काही दिवे गराडे गटातून जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी करीत आहेत, परंतु जनसेवेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या, यापैकी एकही उमेदवाराचे या रस्त्याकडे लक्ष नाही, हे या भागातील मतदाराची दुरभाग्य म्हणण्याचे लागेलच तर सध्या तरी झोपी गेलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना फोन केला असता, फोन उचलत नाहीत व रिप्लाय सुद्धा देत नाहीत, तरी यांची त्वरित निलंबितची ऑर्डर काढावी, अशी सामान्य नागरिकांची मागणी आहे. या रस्त्याकडे डोळे उघडून पाहतील का? हाही प्रश्न सामान्य नागरिकांना पडलेला आहे परंतु, याकडे सार्वजनिक बांधकाम चे अधिकारी अजिबात लक्ष द्यायला तयार नाहीत, त्यासाठी यांच्यावर त्वरित कारवाई ही केली पाहिजे, अशी पुरंदर तालुक्यातील सामान्य नागरिकांची मागणी आहे.

Post a Comment

0 Comments