Hot Posts

6/recent/ticker-posts

जनाई प्रतिष्ठाण ( शेडगाव) अभिनव उपक्रम वर्ष ४ थे. ३५१ भाविकांनी घेतले तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर, श्री क्षेत्र अरण दर्शन सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्री शंकर महाराज प्रकट दिनाचे औचित्य साधून सालाबादाप्रमाणे जनाई प्रतिष्ठाण तर्फे शेडगाव येथील ३५१ भाविकांना मोफत तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर, अरण दर्शन यात्रा नुकतीच संपन्न झाली. यावेळी बोलताना जनाई प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सोमनाथ धेंडे यांनी सांगितले की आम्ही शेडगावकर हा नारा घेऊन जनाई प्रतिष्ठाण तर्फे गेली ४ वर्ष ग्रामस्थांना मोफत दर्शनाची सोय केलेली आहे. यावर्षी ३५१ भाविकांना घेऊन आम्ही दर्शन यात्रा संपन्न केली. यात्रेची सुरुवात शेडगाव येथून झाली प्रथमतः सर्व यात्रेकरू यांनी ग्रामदैवत श्री भैरवनाथ व श्री दत्त मंदिरात आरती करून प्रस्थान केले. सकाळी तुळजापूर येथे तुळजा भवानीचे दर्शन घेतले यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी सर्वजण गाणगापूरला श्री दत्त चिले महाराज येथील मठामध्ये मुक्कामास थांबले. सकाळी संगम येथे सर्वांनी स्नान करून संगमावरील श्रीदत्त मंदिरात दर्शन घेतले, यावेळी गाणगापूर येथे श्री शंकर महाराज प्रकट दिनाचे औचित्य साधून ३५१ भाविकांनी श्री शंकर गीतेचे पारायण संपन्न झाले. यानंतर श्री दत्त मंदिरासमोर पारंपारिक गजे नृत्य सादर केले. सायंकाळी संत शिरोमणी श्री सावता माळी महाराज श्री क्षेत्र अरण येथे दर्शन घेऊन शेडगाव येथे परतीचा प्रवास केला. यावेळी सर्व भाविकांनी जनाई प्रतिष्ठान तसेच आयोजकांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments