Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील जैन समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; पुण्यातील प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे येथील ऐतिहासिक शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन होस्टेल ट्रस्टच्या जमीन आणि इमारत विक्रीच्या कथेत व्यवहारावर सासवड ता. पुरंदर येथील दिगंबर जैन समाज विकास मंडळांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या संदर्भात मंडळांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून, या विक्री प्रक्रियेस तत्काळ स्थगिती देण्याची विनंती करण्यात आलेली आहे. ट्रस्टने समाजाशी सल्ला न घेता चारिस्तेबल उद्देशाचे उल्लंघन करून, विक्रीचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे मंदिराला धोका निर्माण झाला असून, धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत ,असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातील विक्री प्रक्रिया तत्काळ स्थगिती द्यावी, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी तसेच कागदपत्रे सार्वजनिक करण्याचा आदेश आणि सांस्कृतिक वारसा कायमस्वरूपी संरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाच्या हस्तक्षेपाची मागणी या निवेदनातून करण्यात आलेली आहे, सासवड दिगंबर जैन समाज विकास मंडळाचे उपाध्यक्ष धनपाल पाटील, सचिव दिपक पालंबे, खजिनदार संदीप कुरमुडे, संतोष परभणकर, नमोकार गरबे, अशोक ओसवाल यांनी हे निवेदन दिले आहे.

Post a Comment

0 Comments