Hot Posts

6/recent/ticker-posts

मतदार यादीतील गोंधळ व हरकतीवरील सुनावणीवर पोलिसांचा हस्तक्षेप सासवड नगरपरिषदेचा उलटा कारभार ठरला वादाचा विषय सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादीतील गोंधळामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. तब्बल 2800 हरकतीवर पालिकेकडून सुरू असलेल्या कार्यवाहीत ज्याने आक्षेप घेतला त्याने पुरावा द्यावा, त्या ऐवजी मतदारांनाच नोटीस बजावून निवासाची पुरावे मागणे हा पालिकेचा उलटा कारभार वादाचा आणि नाराजीचा विषय ठरला आहे. उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे आणि मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली. उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी दि. 29 सकाळी 11:30 मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी हरकतीवरील सुनावणी ठेवली होती मात्र सुनावणीसाठी उपविभागीय अधिकारी दुपारी चार वाजता उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले ,यामुळे सकाळी आलेल्या अनेक नागरिकांनी मनस्ताप व्यक्त केला, काही इच्छुकांनी तर राजकीय सोयीसाठी नागरिकांची नावे दुसऱ्या प्रभागात ढकलण्यासाठी चे चुकीचे तक्रार अर्ज दिल्याची चर्चा होती चूक नसतानाही दंड मतदार ज्या प्रभागांमध्ये वास्तव राहत करत आहेत, त्याचे नाव दुसऱ्या प्रभागात घेण्यात यावे अशा विशिष्ट तक्रारीवर पालिकेने थेट संबंधित मतदारांनाच नोटीस बजावून त्यांच्या निवासाची पुरावे सादर करण्यास सांगितले. याप्रसंगी अनेक संतप्त मतदारांनी आम्ही राहत असलेले ठिकाण आणि प्रभाग बरोबर असतानाही ज्यांनी आक्षेप घेतला अशांनीच आता आम्ही त्या प्रभागामध्ये राहत नसल्याचे पुरावे द्यावेत अशी ही मागणी करण्यात आली. सकाळी काही नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही आणि काही काळ हंबरीतुमरी वर ही घटना घडली होती. नागरिकांनी ज्याने तक्रार केली त्याला समोर बोलावून पुरावे घ्या अशी मागणी केली, यावर मुख्याधिकाऱ्यांनी 'तुम्हाला जिथे तक्रार करायची तेथे करा' असे उत्तर दिल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. सासवडला तब्बल 2800 हरकतीवर कार्यवाही सुरू अनेक मतदारांना मिळाल्या नोटीस यादीतही नाव बरोबर रवींद्र जगताप यांनी सांगितले की, आमचे घर प्रभाग क्रमांक ११ मध्ये आहे आणि मतदार यादीतही नाव बरोबर आहेत मात्र तक्रार करणाऱ्या एका व्यक्तीने माझ्या कुटुंबातील सर्व नावे प्रभाग क्रमांक दहा मध्ये असल्याचे सांगितले आहे, या तक्रारामुळे त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक कालाच पालिकेकडून नोटीस मिळाली आहे. ज्याने तक्रार दिली त्याने आता मी प्रभाग क्रमांक 10 मध्ये राहत असल्याचा पुरावा द्यावा असे, त्याने ठामपणे म्हटले यावेळी सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आधी उपस्थित होते. दरम्यान, चुकीच्या तक्रारी अर्ज दिल्याने आणि प्रशासनाने त्यावर तातडीने कारवाई करत नागरिकांना नोटीस काढल्याने, नागरिकांनी या भोंगळ कारभारा विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला आहे ,अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने तक्रार करणाऱ्यांचे अर्ज प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांनी फेटाळले आहेत. स्थळ पाणी करूनच पुरावे, घेऊनच नावे निश्चित केली जातील, तसेच स्थळ पाहणीत आढळून न येणाऱ्यांची नावे मतदार यादीवरील छापलेला पत्ता गृहीत धरून, निश्चित केले जातील डॉ. कैलास चव्हाण मुख्याधिकारी सासवड नगरपालिका.

Post a Comment

0 Comments