Hot Posts

6/recent/ticker-posts

देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त सासवड पोलीस स्टेशनच्या वतीने "मिनी मॅरेथॉन स्पर्धा" सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आज रोजी सरदार वल्लभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीच्या निमित्त उपविभागीय पोलीस अधिकारी, भोर उपविभाग, भोर व सासवड पोलीस स्टेशन यांच्या सयूंक्त विद्यमानाने "रन फॉर युनिटी" अंतर्गत "राष्ट्रीय एकता दौड" चे आयोजन करण्यात आले होते, सदर दौडमध्ये राजेंद्रसिंह गौर, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग, तसेच 7 पोलीस अधिकारी, 35 पोलीस अंमलदार तसेच 175-190 नागरिक असे एकूण 210 ते 220 लोकांनी सहभाग घेतला होता. सदर दौड शिवतीर्थ चौक, सासवड ते चंदन टेकडी बायपास व परत शिवतीर्थ चौक अशी (एकूण पाच किलोमीटर) आयोजित करण्यात आली होती. सदर दौड पूर्ण झाल्यानंतर प्रथम आलेल्या 3 पुरुष, 3 महिला यांना व सदर दौड पूर्ण करणारे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना राजेंद्रसिंह गौर, उपविभागीय पोलीस अधिकारी, भोर उपविभाग यांचे हस्ते मेडल देऊन गौरविण्यात आले. तसेच सदर दौड मध्ये सामील झालेल्या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.सर्व सहभागीं रनर याना ORS आणि अल्पोपहारची व्यवस्था करण्यात आली होती. याबाबत सविस्तर माहिती कुमार कदमपोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन यांनी प्रतिनिधीला दिली आहे.

Post a Comment

0 Comments