Hot Posts

6/recent/ticker-posts

Recent posts

Show more
`माघ शुद्ध पौर्णिमेच्या रात्री श्रीनाथांच्या लग्न सोहळ्याने वीरनगरी दुमदुमली तर लाखो भाविकांची उपस्थिती सवाई सर्जाच चांगभलं जयघोषात श्रीनाथांचा विवाह सोहळा पार पडला                                                                    सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                                                                 वीर यात्रेला सुरुवात झाली. कोंडीत पालखी ७ वाजता वेशीवर दाखल झाली. देवाची धुपारती,  मुकादम पाटील धुमाळ, सालकरी, मानकरी दागिनदार विश्वस्त सल्लागार मंडळ यांनी स्वागत करून, पालखी जागेवर स्थानापन्न झाली.रात्री ११ वाजता समस्त राऊत मंडळी यांचेकडून देवाला आकर्षक पोशाख करून, विधी करण्यात आले. कोडीत पालखी, वीरची पालखी, अंधारचिंच येथे दाखल झाली.  याठिकाणी मानकरी यांना फुलाच्या माळा घालून, वाई, कन्हेरी पालखीची भेटाभेट झाली. सर्व पालख्या मंदिराकडे रवाना झाल्या. मंदिरात प्रवेश केल्यावर एक प्रदक्षिणा होऊन, मुकादम पाटील ,धुमाळ यांचे हस्ते विधी व  मंत्रोपचार होऊन पारंपारिक विवाह सोहळा पार पडला. यावेळी पुरोहित, मानकरी, सालकरी दागिनदार श्रीनाथ भक्त उपस्थित होते. सदर सोहळा पाहण्यासाठी लाखोचा जनसमुदाय वीरमध्ये लोटला होता. यावेळी पोलीस प्रशासन, होमगार्ड, पोलीस मित्र, कमांडो फोर्स श्रीनाथ सेवा चे स्वयंसेवक यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, फटाके अतिशबाजी, फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिरात फुलांची सजावट श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट व दिलीपदादा धुमाळ मित्रपरिवार यांचेमार्फत करण्यात आली, फटाके आतिषबाजी स्वप्नील हरकळ, स्वप्निल झांबरे, शिरवळ वाले, प्रशांत साळुंखे,  मंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई कैलास औसक बडदे, बुणगे बंधू, श्रीनाथ लाईट रवी चौरे, नितीन शेंडकर, जनरेटर व्यवस्था राहुल वाल्हेकर, मिथुन धुमाळ स्पीकर व्यवस्था कांदळकर यांचेमार्फत करण्यात आली.श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट यांनी संपूर्ण यात्रा उत्सवाचे नियोजन केल्याचे मुख्य विश्वस्त मोहनराव रावसाहेब धुमाळ यांनी सांगितले. यावेळी सदर श्रीनाथांचा लग्न सोहळा पार पाडण्यासाठी सर्व विश्वस्त मंडळ, सल्लागार सालकरी मानकरी दागीनदार  ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री क्षेत्र वीर यात्रेसाठी श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या पालखीचे ढोल ताशांच्या गजरामध्ये श्री शेत्र कोडीत वरून श्री शेत्र वीर कडे शाही असे प्रस्थान                                   सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                                     माघ शुद्ध पौर्णिमेला रविवारी दि.1 रोजी दुपारी 12:30 च्या सुमारामध्ये आरती होऊन, श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या पालखीचे श्री क्षेत्र कोडीत ता. पुरंदर येथील भक्त तुळाजी बुवा मंदिरापासून वीर तालुका पुरंदर येथील नाथ मस्कोबा, माता जोगेश्वरी यांच्या विवाह सोहळ्याचे प्रस्थान ठेवण्यात आले, याप्रसंगी भाविकांनी फुलांची उधळण करीत 'सवाई सर्जाच चांगभलं' 'नाथ साहेबांचं चांगभलं' च्या गजरामध्ये भाविकांच्या उपस्थितीत वीर यात्रेसाठी श्रीनाथ म्हस्कोबा देवांच्या पालखी काठीचे प्रस्थान ठेवण्यात आले, कोडीत येथील देऊळ वाड्यामध्ये शनिवारी पहाटे उत्सव मूर्तींना अभिषेक घालण्यात आला, त्यानंतर सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारांमध्ये ढोल ताशांच्या पारंपारिक वाद्याच्या गजरांमध्ये मानांच्या काठी, छत्री, आपदागिरी, शौर्य ढाळत, देऊळ वाड्यातून जवळ असणाऱ्या तुळाजीबुवा मंदिर येथे रात्री दहा वाजता पालखी काठी विसावली, त्यानंतर विर येथील बारा दिवसांच्या यात्रे संबंधी नियोजनाची बैठक झाली, यावेळी कोडित ग्रामस्थ, सालकरी, मानकरी, श्री देवस्थान म्हस्कोबा महाराज ट्रस्टचे आजी, माजी पदाधिकारी आदी उपस्थित होते, पहाटे पाच वाजता उत्सव मूर्तींना महारुद्र अभिषेक घालून, पालखीत विराजमान करण्यात आले, त्यानंतर भाविकांनी उत्सव मूर्तीचे दर्शन घेतले, सकाळपासून मंदिरात पालखीच्या दर्शनासाठी रांग लागली होती, श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे दर्शन घेऊन, भाविकांचा आणि वीर कडे पारंपरिक वाटेने निघाली होते, यावेळी पुरंदर हवेलीचे आमदार विजय शिवतारे,  माजी आमदार संजय जगताप, नीरा मार्केट कमिटीचे सभापती संदीप फडतरे, साकेत जगताप, अमोल जगताप, भैय्यासाहेब खैरे,गीतांजली ढोणे पदाधिकारी बहुसंख्येने आदी उपस्थित होते. दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी तुतारी वाजली आणि मानकऱ्यांनी श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या पालखीला खांदा लावला, ढोल ताशांचा गजर, पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये सालकरी, मानकरी ग्रामस्थ आणि हजारो भाविकांचे उपस्थितीमध्ये श्रीनाथाच्या पालखीचे विर कडे प्रस्थान झाले या पालखी पुढे मानाची काठी पालखी समवेत दागीनदार, अब्दागिरी, ढाळत भाविकांच्या उपस्थितीमध्ये अक्षता झेलित, धीम्या गतीने पालखीने मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली आणखी नदीपलीकडे गेल्यावर नागदरी याठिकाणी पारंपारिक मेंढ्यांचे रिंगण, वाद्याच्या गजरांमध्ये पार पडले. पिंपळे ते वीर अशा पालखी मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती. श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांची पालखी भिवडी, सुपे, पिंपळे, पांगारे घाट मार्गे परिंचे गावावरून पालखी राऊतवाडी येथे विसावली. सायंकाळी पालखी वीर येथे पोहोचल्यानंतर सर्व मानकऱ्यांच्या वतीने वीर मध्ये पालखी काठीचे स्वागत केले जाते, रात्री बारा वाजता श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व माता जोगेश्वरी यांचा शाही विवाह संपन्न झाला. आजपासून वीर येथील बारा दिवसांच्या यात्रेला प्रारंभ झालेला आहे.
पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पुरंदर साठी एकाच गावाचे व आडनावाचे उमेदवार असल्याने डोकेदुखी ठरणार                          सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                            7 फेब्रुवारी रोजी शनिवार या दिवशी होत असलेल्या जिल्हा परिषद  पंचायत समितीच्या निवडणूक जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी 19 पंचायत समितीच्या आठ जागांसाठी 33 उमेदवार रिंगणात उतरलेले असून, 22 महिला व 30 पुरुष यात आपले भवितव्य आजमावत असून, या निवडणुकीमध्ये योगायोग म्हणजे एकाच गावातील आणि एकाच आडनावाचे उमेदवार निवडणुकीमध्ये एकमेकांसमोर उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, लढाई जिल्हा परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून ज्योती झेंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रुपाली झेंडे या दोन्ही दिवे गावच्या उमेदवार रिंगणामध्ये उभे आहेत, बेलसर जिल्हा परिषदेच्या जागेसाठी भाजपच्या अजय इंगळे, व शिवसेना रमेश इंगळे दोन्ही वाळूज गावचे तर राष्ट्रवादीचे गौरव कोलते राष्टवादीकडून लढणारे शहाजी कोलते दोघे पिसवॅ गावचे उमेदवार आहेत, वीर गटात देखील राष्ट्रवादीकडून पुष्कराज जाधव व शिवसेनाकडून समीर जाधव हे परिंचे गावचेच उमेदवार आहेत, जिल्हा परिषद गटासाठी जिल्हा परिषदेप्रमाणेच पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा देखील अशी स्थिती असून, गराडे गणातून अर्चना कटके  या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर ललिता कटके या भाजपच्या उमेदवार असून, दोघी भिवरी गावच्या आहेत, माळशिरस गणात अजिंक्य कड राष्ट्रवादीचे व संदीप चौंडकर हे अपक्ष उमेदवार नायगावचेच आहेत, तर याच गणात माऊली यादव भाजप तर शरद यादव शिवसेनेचे उमेदवार असून, दोघे माळशिरस गावचे रहिवासी आहेत, भिवडी गणात शिवसेनेच्या पूजा मोकाशी व भाजपाच्या सायली शिंदे या भिवडी गावच्या तर वीर गणातील काँग्रेस उमेदवार महेश धुमाळ व भाजपा उमेदवार सुधीर धुमाळ हे दोघेही वीर गावचे आहेत नीरा गणात देखील राष्ट्रवादीच्या मोनिका कांबळे व शिवसेनेच्या रेखा केदारी या निरा गावच्या उमेदवार आहेत, आडनावातील साधर्म्य व एकाच गावातील विविध पक्षांचे उमेदवार यामुळे, मतदार आणि उमेदवार यांची  परंतू डोकेदुखी ठरणार असून, संभ्रम निर्माण होणार असल्याचेही चित्र पहावयास मिळत आहे.
पुरंदर तालुक्यातील श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरीला लागली हळद; तर देवाला हळद लावण्यासाठी महिलांची अलोट गर्दी; आज मध्यरात्री धुमधडाक्यामध्ये देवाचा लग्न विवाह सोहळा                                                                       सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                            श्री शेत्र वीर तालुका पुरंदर येथील श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांना हळद लावण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडला, मानकरी राऊत यांच्या महिला बरोबरच गावातील अनेक महिलांनी श्रीनाथ जोगेश्वरीला हळद लावली, हळद लावण्याच्या कार्यक्रमांमध्ये महिलांनी देवाजवळ जाऊन स्वतःच्या हाताने, हळद लावता येते, त्यामुळे महिलांसाठी हा क्षण आनंदायी असतो, परिणामी वीर आणि पंचक्रोशीतील महिलांनी श्रीनाथ जोगेश्वरी यांना हळद लावण्यासाठी खूप गर्दी केली होती, शनिवारी दिनांक 31 पहाटे पाच वाजता पूजा होऊन, मुख्य गाभारा बंद करण्यात आला, नंतर सहा वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला, सकाळी देवाला अभिषेक घालण्यात आले, दुपारी बारा वाजता धुपारती होऊन, मुख्य गाभारा बंद करण्यात आला, दुपारी 1:15 वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला, दुपारी तीन वाजता देवाचे मानकरी, समस्त राऊत मंडळी, देऊळ वाड्यात आले वाजत गाजत देवाची हळद मंदिरात आणली, विधिवत पूजा होऊन, पोशाख व फुलांची मंडवळी देवाला बांधण्यात आली, सायंकाळी 5:30 वाजता देवाला हळद लावण्यासाठी प्रशासकीय स्तरातून वर्षा लांडगे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत पुरंदर व प्रणोती श्रीश्री माळ गटविकास अधिकारी पुरंदर या वीर या ठिकाणी देवाला हळद लावण्यासाठी हजर होत्या,त्याच्या समवेत मंजुषा धुमाळ सरपंच वीर, प्रमिला देशमुख वीर देवस्थान विश्वस्त उपस्थित होत्या. श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टमार्फत यात्रा नियोजनाची संपूर्ण तयारी झालीचे असल्याचे प्रशासनाबरोबर, देवस्थान ट्रस्ट ही यात्रा सोहळ्यासाठी पूर्ण तयारीत असून, रविवारी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या देवाच्या लग्न सोहळ्याची संपूर्ण विधिवत तयारी सुरू असल्याचे देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मोहन रावसाहेब धुमाळ यांनी यावेळी सांगितले, समस्त मानकरी राऊत, ग्राम पुरोहित मुकादम पाटील गुरव यांच्या सुवासिनींच्या वतीने, शनिवारी दुपारी साडेतीन वाजता देवाला हळद लावण्यास सुरुवात करण्यात आली, सर्व ग्रामस्थ महिला तसेच बाहेरून आलेल्या महिला भाविकांनी मंदिरात देवाला हळद लावण्यासाठी गर्दी केली होती, सायंकाळी सात वाजेपर्यंत देवाला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होता, महिला वर्गाने खूप गर्दी केली होती, तसेच देवस्थानमार्फत दर्शन बारी, होमगार्ड व्यवस्था करण्यात आली होती, यावेळी विश्वस्त व सल्लागार मंडळ, ग्रामस्थ, मानकरी, दागीनदार सालकरी मंडळी आधी उपस्थित होते.
सासवड येथे एनएसएस विशेष हिवाळी शिबिर उत्साहात संपन्न                                                                       सासवड : बापू मुळीक  मुख्य  संपादक  पुरंदर  प्राईम  न्यूज:                पुणे जिल्हा शिक्षण संस्थेच्या सेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी, सासवड येथील राष्ट्रीय सेवा योजना  (एन एस एस) विभागाच्या वतीने १८ ते २४ जानेवारी २०२६ या कालावधीत सुपे खुर्द, ता. पुरंदर, जि. पुणे येथे विशेष हिवाळी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हे शिबिर राष्ट्रीय सेवा योजना – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने राबविण्यात आले.“युवक, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन व पडीक जमिनीचा विकास – शाश्वत विकासासाठी” या विषयावर आधारित या सात दिवसीय शिबिरात एकूण ५० स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिबिरादरम्यान स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, प्लास्टिक संकलन, जलसाक्षरता, आरोग्य तपासणी, औषधांविषयी जनजागृती, विविध सर्वेक्षणे, पथनाट्य व ग्रामजागृती उपक्रम राबविण्यात आले.शिबिराच्या पहिल्या दिवशी गाव परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. दुसऱ्या दिवशी शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले. तिसऱ्या दिवशी बजाज पुणे ग्रँड सायकल टूर २०२६ निमित्त प्लास्टिक संकलन मोहीम राबविण्यात आली. चौथ्या दिवशी कालबाह्य औषधांचे दुष्परिणाम, योग्य औषधवापर व प्लास्टिक कचरा व्यवस्थापन याविषयी घरोघरी सर्वेक्षण व प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले. पाचव्या दिवशी स्वयंसेवकांनी बजाज पुणे ग्रँड सायकल टूर २०२६ दरम्यान स्वयंसेवक म्हणून सेवा बजावली.सहाव्या दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तसेच ग्रामस्थ व स्वयंसेवकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शेवटच्या दिवशी शिबिराचा समारोप सोहळा पार पडला. यावेळी स्वयंसेवकांनी आपले अनुभव व्यक्त केले आणि पुन्हा एकदा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.शिबिरादरम्यान योग, जलसाक्षरता, ग्रामविकास, महिलांचे स्वसंरक्षण, उद्योजकता व कृषी प्रक्रिया उद्योग या विषयांवर विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण, शिस्त आणि ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव निर्माण झाला.या शिबिराचे समन्वयक म्हणून प्रा. सुमित मुसळे, प्रा. हनुमंत पाटील व प्रा. प्रशांत गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संपूर्ण शिबिराचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापकवर्ग, कर्मचारी, स्वयंसेवक तसेच सुपे खुर्द गावातील ग्रामस्थांनी सहकार्य केले.
राज्यातील 12 जिल्हा परिषद व त्या अंतर्गत 125 पंचायत समितीच्या सार्वत्रि क निवडणुका मतदानाची दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी तर मतमोजणी दिनांक 9 फेब्रुवारी 2026रोजी                                                                सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                         राज्य निवडणूक आयोगाचे संदर्भातील अनुक्रमांक 2 समोरील 13.1.2026 रोजीच्या पत्रान्वये राज्यातील 12 जिल्हा परिषद व त्या अंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे, सदर निवडणूक कार्यक्रमांनुसार संबंधित जिल्हा कार्यालयांनी दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी उमेदवारी मागे घेणे ,आणि चिन्ह वाटपा नंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, मतदान,मतमोजणी व निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे, हे टप्पे पार पडणे शिल्लक आहेत, माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिनांक 31 जानेवारी 2026 च्या पुढे दोन आठवडे ची मुदत दिलेली आहे, मात्र दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित आशाताई अनंतराव पवार यांच्या अपघाती निधनामुळे, राज्य शासनाने संदर्भातील अनुक्रमांक 3 समोरील 28 जानेवारी 2026 रोजीच्या बिनतारी संदेश नावे राज्यात दिनांक 28 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 पर्यंत राज्यस्तरावरील दुखावटा जाहीर केला आहे, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना उपरोक्त परिच्छेदातील नमूद कालावधीमध्ये प्रचार करणे सोयीचे होणार नसल्याचे परिणाम, मतदान व मतमोजणी इत्यादी निवडणूक टप्पे निश्चित केलेल्या दिनांकात पार पाडणे, शक्य होणार नाही, उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता, महाराष्ट्र जिल्हा परिषदा मतदार विभाग आणि निवडणुका घेणे नियम 1962 तसेच महाराष्ट्र पंचायत समिती निर्वाचक गण आणि निवडणूक घेणे नियम 1962 यामधील अनुक्रमे नियम 11(2 अ) आणि नियम 13 (3) मधील तरतुदीनुसार 12 जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत 125 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा परिच्छेद 1 मध्ये नमूद केलेल्या उर्वरित टप्प्यांचा निवडणूक कार्यक्रम नव्याने देणे आवश्यक झाले आहे, तरी या सोबतच्या परिशिष्ट 1 अनुसार सुधारित निवडणूक कार्यक्रम देण्यात येत असून, जिल्हाधिकारी यांनी सदर निवडणूक कार्यक्रमातील वेळापत्रकानुसार निवडणुकीचा कार्यक्रम राबविण्यात यावा, तसेच जिल्हाधिकारी यांनी निवडणुकीच्या सुधारित कार्यक्रमाची सूचना 31 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करून, सदर कार्यक्रमास आवश्यकतेनुसार व नियमाप्रमाणे व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी, निवडणुकीची आचारसंहिता सध्या सुरू असून, निवडणुकीचा निकाल घोषित होईपर्यंत, अमलात राहील तसेच राज्य निवडणूक आयोगाचे दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी च्या पत्रान्वये देण्यात आलेल्या सूचनांचे जिल्हाधिकारी यांनी पालन करावे, सदरचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, राज्य निवडणूक आयोगाचे ,संकेतस्थळ व ई-मेल आयडी पुढील प्रमाणे आहे संकेतस्थळ: https:// mahasec. maharashtra. gov. in ई-मेल :sec.zpp@mah.gov.in जिल्हाधिकारी यांनी निवडणुकीच्या सुधारित कार्यक्रमाची सूचना प्रसिद्ध करण्याची दिनांक 31 जानेवारी 2026 शनिवारपासून, मतदानाची दिनांक 7 फेब्रुवारी 2026 शनिवार सकाळी 7:30 ते संध्याकाळी  5:30 पर्यंत मतमोजणी दिनांक 9 फेब्रुवारी 2026 सोमवार या दिवशी सकाळी दहा पासून पुढे तर निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे दिनांक 11 फेब्रुवारी 2026 बुधवार पर्यंत या संदर्भातील माननीय राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार सुरेश काकांणी सचिव राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी ही सर्व माहिती दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन बारामती जवळ विमान अपघात; तर महाराष्ट्रभर शोककळा राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण                                                सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                                  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या राजकारणातील प्रभावी नेते अजित अनंतराव पवार यांचे मंगळवारी दि. 28 रोजी बारामती जवळ झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन असे झाले असून, राजकीय सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातून तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे, प्राप्त माहितीनुसार अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत असताना, लँडिंग च्या वेळी त्यांच्या चार्टडॅ विमानाला अपघात झाला,अपघात इतका भीषण होता की, विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील इतर प्रवासी पाच मेंबर्स यांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे, यामध्ये अजित पवार यांच्यासह पांजन यांचा मृत्यू झाल्याची अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन ,अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथके, तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असता, परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून, अपघाताच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे, नागरी विमान वाहतूक विभागाकडूनही चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अजित पवार हे त्यादिवशी बारामती परिसरात नियोजित कार्यक्रम बैठकीसाठी येत होते, त्यांच्या अचानक जाण्याने बारामती सह, संपूर्ण राज्यात शोकाचे वातावरण आहे, अनेक ठिकाणी कार्यकर्ते समर्थक आणि नागरिकांनी अश्रूंनी श्रद्धांजली अर्पण केली, दरम्यान: राज्यपाल मुख्यमंत्री, केंद्रीय व राज्यस्तरीय नेते विविध पक्षाचे नेते तसेच सामाजिक संस्थांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. महाराष्ट्राने एक कर्तृत्व निर्णयक्षम आणि धडाडीचा नेता गमावला अशा शब्दात अनेक नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, सासवड मध्ये आज सकाळी पासून 90% दुकाने बंद ठेवण्यात आलेली आहेत, सर्व पुरंदर तालुक्यातील सामान्य जनतेवर शोककळा पसरलेली आहे, विविध पक्षाचे नेते, तसेच सामाजिक संस्थांनी अजित पवार यांच्या निधनाबदल तीव्र दुःख व्यक्त केले आहे, महाराष्ट्राने एक कर्तुत्व निर्णय क्षम धडाडीचा नेता गमावला असून, अशा शब्दांमध्ये अनेक नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केले आहेत .राजकीय प्रवास अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होते, बारामती मतदारसंघातून अनेक वेळा ते आठ वेळा निवडून आलेले आहेत, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री यासारखे जबाबदारी सांभाळत राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या स्पष्ट वक्तेपणा, निर्णय क्षमता आणि प्रशासकीय पकडीसाठी ते ओळखले जात होते, शोक संदेश त्यांच्या निर्णयाने केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच नव्हे ,तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का बसलेला आहे, राज्यातील अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले असून ,शासकीय पातळीवर शोक व्यक्त करण्यात येत आहेत, अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना, उपविभागीय अधिकारी तथा प्रांत  पुरंदर वर्षा लांडगे व तहसीलदार विक्रम राजपूत पुरंदर या कडून तीव्र दुःख व्यक्त शासकीय पातळीवरून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
Load More That is All