Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणच्या अपघाताचा 17 दिवसानंतर गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: शहरातील पीएमपीएल बस स्टॉप परिसरामध्ये 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी झालेल्या एका अपघात प्रकरणी सासवड पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांना शोधून तक्रार देण्यास भाग पाडल्यानंतर, घटनेच्या तब्बल 17 दिवसानंतर शुक्रवारी दि.4) रोजी सासवड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल होऊन, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटारीच्या धडकेत प्रेम लखन चव्हाण (वय 8 राहणार सासवड) या चिमुरड्यांचा मृत्यू झाला असून, तर पियुष हनुमंत पावगे (वय 21 राहणार अंदोरी सातारा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. विशाल बाळाराम चव्हाण मृताचे काका राहणार पारगाव मेमाणे (ता. पुरंदर )यांनी फिर्याद दिली आहे. पियुष हनुमंत पावगे( वय 21 राहणार आंदोरी सातारा) हा चालक मोटार एमएच 11 डी एन ए 0657 भरदाव वेगात चालवत होता, प्रेमच्या सायकल ला त्याने जोरदार धडक दिली ,अपघातानंतर प्रेमला ससून हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना तीन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी प्रेमच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना दिली, तरी कोणतीही नातेवाईक रुग्णालयात फरकले नाहीत, त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी सासवडचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी नातेवाईकांना शोधून तक्रार नोंदवण्यास भाग पाडले.

Post a Comment

0 Comments